Babar Azam, इफ्तिखार अहमद यांची रेकॉर्ड तोड खेळी! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नेपाळवर दादागिरी

कर्णधार बाबर आजम, मोहम्मद रिझवान अन् इफ्तिखार अहमद यांनी नेपाळच्या गोलंदाजांची दैना उडवली. बाबर-इफ्तिखार यांनी निर्दयीपणे गोलंदाजांना बदडले अन् १३१ चेंडूंत २१४ धावांची विक्रमी भागीदारी केली. बाबर आणि इफ्तिखार यांनी शतक झळकावले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 06:51 PM2023-08-30T18:51:45+5:302023-08-30T18:52:11+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Babar Azam  scored 151 runs from 131 balls including 14 Fours and 4 Sixes, Iftikhar Ahmed 109* ( 71 balls), Pakistan 6/342 | Babar Azam, इफ्तिखार अहमद यांची रेकॉर्ड तोड खेळी! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नेपाळवर दादागिरी

Babar Azam, इफ्तिखार अहमद यांची रेकॉर्ड तोड खेळी! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नेपाळवर दादागिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चांगला खेळ पाहायला मिळाला. प्रथमच स्पर्धेत खेळणाऱ्या नेपाळने चांगली गोलंदाजी करून सुरुवातीला पाकिस्तानला धक्के दिले. पण, कर्णधार बाबर आजम, मोहम्मद रिझवान अन् इफ्तिखार अहमद यांनी नेपाळच्या गोलंदाजांची दैना उडवली. बाबर-इफ्तिखार यांनी निर्दयीपणे गोलंदाजांना बदडले अन् १३१ चेंडूंत २१४ धावांची विक्रमी भागीदारी केली. बाबर आणि इफ्तिखार यांनी शतक झळकावले. 

नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले


फखर जमान ( १४),  इमाम-उल-हक ( ५) हे सलामीवीर फलकावर २५ धावा असताना माघारी परतले. बाबर व रिझवान या अनुभवी खेळाडूंनी डाव सावरला. पण, रिझवान ५० चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला आणि बाबरसह त्याची ८६ धावांची ( १०६ चेंडू) भागीदारीही संपुष्टात आली. आघा सलमानही रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात संदीप लामिछानेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला अन् पाकिस्तानला १२४ धावांवर चौथा धक्का बसला. नेपाळच्या खेळाडूंनी दोन अप्रतिम रन आऊट केले. बाबर एका बाजूने खिंड लढवत होता अन् यावेळी त्याला इफ्तिखारची साथ मिळाली. ५५ धावांवर बाबरचा सोडलेला झेल त्यांना महागात पडला. 



इफ्तिखारने ४३ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. बाबरने १०९ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानने ४१.२ षटकांत ४ बाद २२५ धावा केल्या. त्याने १०२ इनिंग्जमध्ये १९ शतकं झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. द. आफ्रिकेच्या हाशिम आमलाने १०४ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता.  विराट कोहली ( १२४) व डेव्हिड वॉर्नर ( १३९) यांनी सर्वाधिक इनिंग्ज खेळल्या होत्या. शेवटच्या षटकांत बाबर-इफ्तिखार यांच्या फटकेबाजीने प्रेक्षकांना खुश केले. ६ च्या खाली आलेला रन रेट या दोघांनी शेवटच्या काही षटकांत १२च्या सरासरीने फटकेबाजी करून उंच नेला. ४० ते ४५ षटकांत दोघांनी ६२ धावा चोपल्या. इफ्तिखारने वन डे तील त्याचे पहिले शतक पूर्ण केले आणि तेही ६७ चेंडूंत... 


बाबर १३१ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५१ धावांवर झेलबाद झाला. इफ्तिखार ७१ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला अन् पाकिस्तानने ६ बाद ३४२ धावा चोपल्या. ४६ ते ५० षटकांत त्यांनी २ बाद ६७ धावा केल्या. 

Web Title: PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Babar Azam  scored 151 runs from 131 balls including 14 Fours and 4 Sixes, Iftikhar Ahmed 109* ( 71 balls), Pakistan 6/342

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.