PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक २०२३ ला आजपासून सुरूवात झाली आणि यजमान पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर आशिया चषकाची पहिली मॅच झाली. पाकिस्तान व नेपाळ यांच्यात सलामीचा सामना मुल्तान येथे खेळला जातोय आणि प्रथमच आशिया चषकात खेळणाऱ्या नेपाळने यजमानांची गोची केली. फखर जमान व इमाम उल हक या सलामीवीरांना अवघ्या २५ धावांवर नेपाळने माघारी पाठवले आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून नेपाळ विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळ प्रथमच आशिया चषक खेळतेय. ५ धावांवर इमाम उल हकचा झेल सुटला. पण, पुढच्याच षटकात नेपाळचा गोलंदाज करण केसीने ईंगा दाखवला. फखर जमान ( १४) यष्टिरक्षक आसीफ शेखच्या हाती झेल देऊन परतला. पाकिस्तानला २१ धावांवर पहिला धक्का बसला. सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर १ धाव चोरण्याचा प्रयत्न पाकिस्तानला महागात पडला..कर्णधार रोहित पौडेलने वेगवान थ्रो करून इमामला ( ५) रन आऊट केले.
नेपाळविरूद्धचा सामना झाल्यानंतर पाकिस्तानी संघ ३१ ऑगस्ट रोजी भारताविरूद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल. भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी २ सप्टेंबरला आमनेसामने असतील. अफगाणिस्तानला वन डे मालिकेत पराभूत करून पाकिस्तानी संघाने वन डे क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं आहे. "आम्ही वेळ आल्यावर भारताविरूद्धच्या सामन्याबद्दल रणनीती आखू. मी जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हाच ठरवलं की संघाची विचारसरणी बदलायची आणि त्यात मला यश आल्याचं दिसतं", असं बाबर आजमनं सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटलं होतं.
Web Title: PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Two big wickets of Fakhar Zaman and Imam-ul-Haq within just six overs; What a start for Nepal, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.