PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : आशिया चषक २०२३ ला आजपासून सुरूवात झाली आणि यजमान पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनंतर आशिया चषकाची पहिली मॅच झाली. पाकिस्तान व नेपाळ यांच्यात सलामीचा सामना मुल्तान येथे खेळला जातोय आणि प्रथमच आशिया चषकात खेळणाऱ्या नेपाळने यजमानांची गोची केली. फखर जमान व इमाम उल हक या सलामीवीरांना अवघ्या २५ धावांवर नेपाळने माघारी पाठवले आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून नेपाळ विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळ प्रथमच आशिया चषक खेळतेय. ५ धावांवर इमाम उल हकचा झेल सुटला. पण, पुढच्याच षटकात नेपाळचा गोलंदाज करण केसीने ईंगा दाखवला. फखर जमान ( १४) यष्टिरक्षक आसीफ शेखच्या हाती झेल देऊन परतला. पाकिस्तानला २१ धावांवर पहिला धक्का बसला. सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर १ धाव चोरण्याचा प्रयत्न पाकिस्तानला महागात पडला..कर्णधार रोहित पौडेलने वेगवान थ्रो करून इमामला ( ५) रन आऊट केले.