हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या नेपाळने पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 05:08 PM2023-08-30T17:08:13+5:302023-08-30T17:09:01+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Watch Video of Brain-fade error by Mohammad Rizwan ( 44) , he doesn't ground his bat and pakistan lost 4th wicket in 124 runs, R Ashwin give advice | हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video

हास्यास्पद! मोहम्मद रिझवान बॅट क्रिजवर ठेवायलाच विसरला; R Ashwin ने घेतली शाळा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या नेपाळने पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. फखर जमान व इमाम-उल-हक या सलामीवीरांना २५ धावांवरच नेपाळने माघारी पाठवले. नेपाळचा कर्णधार रोहितच्या डायरेक्ट हिटवर इमाम रन आऊट झाला. कर्णधार बाबर व मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंनी पाकिस्तानचा डाव सावरला. पण, नेपाळच्या टिच्चून माऱ्यासमोर त्यांच्या धावांना वेग मिळाला नाही. या दडपणात त्यांच्याकडून चूकाही झाल्या अन् रिझवान सैरभैर झालेला दिसला. त्याच गोंधळात त्याने स्वतःची विकेट फेकली अन् भारताचा फिरकीपटू आर अश्विनने ( R Ashwin) त्याची शाळा घेतली.

'नेपाळ'मध्ये सामना खेळवायला हवा होता! Asia Cupच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान ट्रोल


नेपाळचा गोलंदाज करण केसीने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. फखर जमान ( १४) यष्टिरक्षक आसीफ शेखच्या हाती झेल देऊन परतला. ५ धावांवर जीवदान मिळालेला इमाम उल हक १ धाव चोरण्याचा प्रयत्नात रन आऊट झाला. कर्णधार रोहित पौडेलने वेगवान थ्रो करून इमामला ( ५) रन आऊट केले. कर्णधार बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला, परंतु नेपाळच्या लयबद्ध गोलंदाजीने धावांचा ओघ आटवला होता. त्यामुळे धावांचा वेग वाढवण्यासाठी रिझवान व बाबर यांनी हात मोकळे करण्यास सुरूवात केली.


२४व्या षटकात मोहम्मद रिझवान एक धाव घेण्यासाठी पळाला अन् दिपेंद्र सिंग ऐरीने अचूक थ्रो केला. चेंडू शरिराला लागण्यापासून वाचवण्यासाठी रिझवानने उडी मारली, पण तो जमिनीवर येईपर्यंत चेंडूने यष्टींचा वेध घेतला. रिझवान बॅट क्रिजवर ठेवणेच विसरसला. तो ५० चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावांवर बाद झाला आणि बाबरसह त्याची ८६ धावांची ( १०६ चेंडू) भागीदारीही संपुष्टात आली. आघा सलमानही रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात संदीप लामिछानेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला अन् पाकिस्तानला १२४ धावांवर चौथा धक्का बसला.   
 
थ्रोच्या उंचीमुळे रिझवानला चेंडूपासून वाचणे कठीण झाले होते. परंतु जो सामान्यतः विकेट्सच्या दरम्यान धावत असताना डाईव्ह मारतो, त्याच्यासाठी असे बाद होणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्याला फिरकीविरुद्ध स्वीप करणे आवडते. 

Web Title: PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : Watch Video of Brain-fade error by Mohammad Rizwan ( 44) , he doesn't ground his bat and pakistan lost 4th wicket in 124 runs, R Ashwin give advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.