Join us  

PAK vs NZ 2nd Test : पराभवाच्या 'दरीत' पडलेल्या पाकिस्तानला अंधुक प्रकाशाने वाचवले; सर्फराज अहमदचे शतक सार्थी लागले

Pakistan vs New Zealand 2nd Test : पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटीही थरारक झाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 6:33 PM

Open in App

Pakistan vs New Zealand 2nd Test : पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटीही थरारक झाली... पहिल्या कसोटीत अंधुक प्रकाशामुळे पाकिस्तानचा पराभव टळला, परंतु किवींनी दुसऱ्या कसोटीतही यजमानांची कोंडी केली. ज्याला संघाबाहेर केले होते, त्याच सर्फराज अहमदने दोन वर्षांची कमबॅक करताना विजयाच्या आशा दाखवल्या. पण, न्यूझीलंड हार मानणारा नव्हता अन् त्यांनी अचूक डावपेच आखले. दिवसाचा खेळ संपायला ७ षटकं शिल्लक असताना त्यांनी शतकवीर सर्फराजला बाद केले. आता न्यूझीलंडला केवळ एक विकेट घ्यायची होती. नसीम शाह संघर्ष करताना दिसला.. पाकिस्तानच्या चाहत्यांची, खेळाडूंची धाकधुक वाढली होती. पण, अखेर अंधुक प्रकाशच पाकिस्तानच्या मदतीला धावला... ३ षटकं शिल्लक असताना सामना थांबवण्याचा निर्णय घेतला गेला अन् हाही सामना अनिर्णित सुटला.  न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ४४९ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४०८ धावा केल्या. किवींनी ५ बाद २७७ धावांवर दुसरा डाव घोषित करून पाकिस्तानसमोर ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले. पहिली कसोटी अनिर्णित राखल्यानंतर पाकिस्तानला मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. पण, त्यांचा सलामीवीर फलकावर शून्य धाव असतानाच माघारी परतला आहे. अब्दुल्लाह शफिक व मीर हम्झा यांना भोपळ्यावर माघारी पाठवून किवींनी पाकिस्तानची कोंडी केली. इमाम-उल-हक ( १२), शान मसूद ( ३५) व कर्णधार बाबर आजम ( २७) हेही अपयशी ठरले. 

२०१९नंतर पाकिस्तानच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या सर्फराज अहमदने  किवी गोलंदाजाचा सामना केला. त्याने सलग चौथे अर्धशतक झळकावताना पाकिस्तानला आशेचा किरण दाखवला. सौद शकिल ( ३२) व आघा सलमान ( ३०) यांनी त्याला उत्तम साथ दिली. सर्फराज एकटा भिडत होता आणि त्याने कसोटी कारकिर्दीतले चौथे शतक झळकावले.  पाचव्या दिवसाची अखेरची ९ षटकं शिल्लक असताना न्यूझीलंडने नवा चेंडू मागवला अन् टीम साऊदीने पाकिस्तानला आठवा धक्का दिला. सर्फराज अखेरची ८ षटकं आरामात खेळून काढेल असे वाटत असताना किवींनी मायकेल ब्रेसवेलला गोलंदाजीला आणले. फिरकीपटूने कमाल केली अन् सर्फराजची डाव्या स्लीपमध्ये कॅच उडाली. सर्फराज १७६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ११८ धावा केल्या.  नसीम शाह व अब्रार अहमद यांनी संघर्ष केला. न्यूझीलंडने सर्व फिल्डर  जवळ उभे केले अन् नसीमने जोरदार फटके मारले. पाकिस्तानला विजयासाठी ४ षटकांत १७ धावा हव्या होत्या अन् किवींना १ विकेट घ्यायची होती. ईश सोढीच्या गोलंदाजीवर अब्रारसाठी LBW अपील झाले अन् किवींनी DRS घेतला पण तो वाया गेला. पाकिस्तानने ९ बाद ३०९ धावा केल्या, अंधुक प्रकाशामुळे सामना ड्रॉ करावा लागला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App