पाकिस्ताननेबाबर आजमच्या नेतृत्वाखाली चौथ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडवर १०२ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या ६ बाद ३३४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४३.४ षटकांत २३२ धावांत तंबूत परतला. या विजयासह पाकिस्तानने ५ सामन्याच्या मालिकेतील आघाडी ४-० अशी आणखी मजबूत केली. हा विजय पाकिस्तान क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला.. जागतिक वन डे क्रमवारी सुरू झाल्यापासून पाकिस्तानला एकदाही नंबर १ बनता आले नव्हते आणि आज बाबरच्या नेतृत्वाखाली त्यांनी वन डे क्रिकेटमधील नंबर वन स्थान पटकावले. त्यांनी ऑस्ट्रेलिया व भारताला ( समान ११३ गुण) मागे टाकले.
चौथ्या वन डे सामन्यात फाखर जमान ( १४) व शान मसूद ( ४४) हे सलामीवीर माघारी परतले. बाबरने ११७ चेंडूंत १०७ धावांची खेळी करताना वन डेतील १८वे शतक झळकावले. त्याला आघा सलमान ( ५८) ची साथ मिळाली आणि पाकिस्तानने ३३४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम ( ६०) व मार्क चॅम्पमन ( ४६) यांनी चांगला खेळ केला. उसामा मीरने चार, मोहम्मद वासीमने ३, तर हॅरीस रौफने २ विकेट्स घेतल्या.
Web Title: PAK vs NZ : BREAKING: In 52 years of ODI cricket Pakistan become World 1 ODI team after win against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.