PAK vs NZ: पाकिस्तानचा सलग चौथा पराभव! खेळाडूंनी एकमेकांवर फोडलं खापर; आता अस्तित्वाची लढाई

पाकिस्तानी संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 02:53 PM2024-01-20T14:53:40+5:302024-01-20T14:53:59+5:30

whatsapp join usJoin us
 PAK vs NZ Captain Shaheen Afridi and Mohammad Rizwan react after Pakistan's fourth straight defeat  | PAK vs NZ: पाकिस्तानचा सलग चौथा पराभव! खेळाडूंनी एकमेकांवर फोडलं खापर; आता अस्तित्वाची लढाई

PAK vs NZ: पाकिस्तानचा सलग चौथा पराभव! खेळाडूंनी एकमेकांवर फोडलं खापर; आता अस्तित्वाची लढाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानी संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप झाला. अध्यक्षांनी राजीनामा देताच एकच खळबळ माजली. पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तिने पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. यजमान न्यूझीलंडने चार सामने जिंकून ४-० अशी विजयी आघाडी घेतली. शुक्रवारी झालेला चौथा सामना गमावताच पाकिस्तानी खेळाडूंची चिडचिड झाली. सामन्यानंतर बोलताना मोहम्मद रिझवान आणि कर्णधार शाहीन आफ्रिदी यांनी खेळाडूंवर पराभवाचे खापर फोडले. पाकिस्तानने चालू मालिकेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली पण विजय मिळवता आला नाही. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण, मोहम्मद रिझवान वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रिझवानने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६३ चेंडूत ९० धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये मोहम्मद नवाजने २१ धावांची स्फोटक खेळी करून पाकिस्तानची धावसंख्या १५० पार पोहोचवली. पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. यजमान न्यूझीलंडने प्रत्युत्तरात १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करून सलग चौथा विजय मिळवला. 

पाकिस्तानचा सलग चौथा पराभव!
सलग चौथ्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने सांगितले की, मला वाटते की ज्या पद्धतीने मोहम्मद रिझवानने सुरूवात केली होती. ते पाहता आम्ही चांगली कामगिरी केली होती. पण, दुर्दैवाने अखेरच्या काही षटकांमध्ये आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. मला वाटते की या खेळपट्टीवर १७० धावा व्हायला हव्या होत्या. जर आम्ही संधीचा फायदा घेतला असता तर नक्कीच सामना जिंकला असता. एकूणच आफ्रिदीने अखेरच्या काही षटकांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा झाल्या नसल्याचे नमूद केले.

मोहम्मद रिझवानने पराभवानंतर आपल्या संघातील गोलंदाजांचे कान टोचले. तो म्हणाला, "माझे शतक व्हावे यासाठी मी खेळत नव्हतो. मला इफ्तिखारने सांगितले की, या खेळपट्टीवर १५० धावा पुरेशा आहेत. इथे मोठी धावसंख्या होऊ शकत नाही. आमच्या गोलंदाजांना विकेट घेता येत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याबद्दल उमर गुलला विचारा तो सांगेल. शाहीन आफ्रिदीने सुरूवातीला बळी घेतला पण मधल्या काही षटकांमध्ये काहीच करता आले नाही." खरं तर या खेळपट्टीवर १७० धावा करायला हव्या होत्या असे पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने म्हटले. 

Web Title:  PAK vs NZ Captain Shaheen Afridi and Mohammad Rizwan react after Pakistan's fourth straight defeat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.