Join us  

PAK vs NZ : २०२३च्या पहिल्या शतकाचा मान न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेचा! पाकिस्तानचा वाजवला बँड

PAK vs NZ : पाकिस्तानची घरच्या प्रेक्षकांसमोर वस्त्रहरणाची परंपरा २०२३ मध्येही कायम दिसत आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कराची येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पकड घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 3:27 PM

Open in App

PAK vs NZ : पाकिस्तानची घरच्या प्रेक्षकांसमोर वस्त्रहरणाची परंपरा २०२३ मध्येही कायम दिसत आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कराची येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पकड घेतली आहे. किवी फलंदाज डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) याने २०२२ ( वि. बांगलादेश) प्रमाणे २०२३ मध्येही वर्षातील पहिल्या शतकवीराचा मान पटकावला. मागील वर्षातही कॉनवे वर्षातील पहिला शतकवीर ठरला होता आणि यंदाही... २०२१मध्ये केन विलियम्सनने ( वि. पाकिस्तान) हा मान पटकावला होता. सलग तिसऱ्या वर्षी किवी फलंदाजांनी नव्या वर्षाची सुरुवात शतकाने केली आहे. 

पहिली कसोटी ड्रॉ राखल्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आनंदात होते. पण, किवींनी दुसऱ्या कसोटीत दमदार फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या फ्लॅट खेळपट्टी चर्चेचा विषय बनत आहे. टॉम लॅथम आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. लॅथम १०० चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला. कॉनवे व कर्णधार केन विलियम्सन यांनी  शतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल केली आहे. पहिल्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने १ बाद २२६ धावा केल्या आहेत.

कॉनवे १७९ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह नाबाद १२० धावा केल्या आहेत, तर केन २९ धावांवर खेळतोय.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :न्यूझीलंडपाकिस्तान
Open in App