ICC ODI World Cup Pak vs Nz Live : पाकिस्तानी फलंदाज फखर जमान ( Fakhar Zaman) याने आज स्फोटक खेळी करून त्याची निवड पुन्हा एकदा योग्य ठरवली. फखर व कर्णधार बाबर आजम यांच्या फटकेबाजीने पाकिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पकड घेतली. पण, पावसाचे आगमन झाले अन् मॅच थांबली. पावसामुळे ही मॅच पुन्हा सुरू न झाल्यास पाकिस्तान डकवर्थ लुईस नियमानुसार १० धावांनी जिंकेल, पण षटकांची संख्या कमी होऊन मॅच सुरू झाल्यास?
४०२ धावांचा डोंगर सर करताना कोणाचीही दमछाक उडणे साहजिक आहे. त्यात अब्दुल्लाह शफीक (४) दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर जाणे अपेक्षित होता. पण, फखर जमान आणि बाबर आजम यांनी वादळी खेळी केली. फखरने तर ६३ चेंडूंत ९ षटकार व ६ चौकार खेचून शतक पूर्ण केले आणि पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमधील हे सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. पावसाचे सावट लक्षात घेऊन पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि २१.३ षटकांनंतर पाऊस आलाच. मात्र, पाकिस्तानने १ बाद १६० धावा केल्या होत्या आणि DSL नुसार पाकिस्तानचा संघ १० धावांनी पुढे होता.
जर षटकं कमी झाल्यास..
पाकिस्तानसमोरील सुधारित लक्ष्य असं असेल
- ४५ षटकांत ३७० धावा ( त्यांना २३.३ षटकांत २१० धावांची गरज)
- ४० षटकांत ३३५ धावा ( १८.३ षटकांत १७५ धावांची गरज)
- ३५ षटकांत २९७ धावा ( १३.३ षटकांत १३७ धावांची गरज)
- ३० षटकांत २५२ धावा ( ८.३ षटकांत ९२ धावांची गरज)
Web Title: PAK vs NZ Live : Due to rain If overs are reduced, then who will be in benefit, Pakistan or New Zealand? know scenario
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.