Join us  

रचिन रवींद्रने पाकिस्तानला झोडून काढले; डेव्हिड बून, राहुल द्रविड आदी दिग्गजांशी बरोबरी

ICC ODI World Cup Pak vs Nz Live :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 12:24 PM

Open in App

ICC ODI World Cup Pak vs Nz Live :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केन विलियम्समनच्या पुनरागमनाने किवींचा उत्साह वाढला आहे आणि त्याच्यासह संघाता मार्क चॅम्पमन व इश सोढी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला आहे. जिमी निशॅम, विल यंग व मॅट हेनरी हे आज बाहेर आहेत.  न्यूझीलंडने आज संघात लेग स्पिनर घेतला, तर पाकिस्तानने संघातील लेग स्पिनर बाहेर केला. किवी तीन फिरकीपटूंसह आज खेळतोय. तेच पाकिस्तान इफ्तिखार अहमद व सलमान आघा या दोन पार्ट टाईम फिरकीपटूंसह खेळतोय. हसन अलीचे पुनरागमन झाल्याने चार जलदगती गोलंदाजांचा मारा पाहायला मिळेल.

डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी सावध सुरूवातीनंतर हात मोकळे केले. त्यांचे नैत्रदिपक फटके चाहत्यांची वाहवाह मिळवत होते. दोघांनी १०.५ षटकांत फलकावर ६८ धावा चढवल्या होत्या आणि हसन अलीने पहिला धक्का दिला. कॉनवे ३५ ( ३९ चेंडू) धावांवर झेलबाद झाला. वन डेतील हसन अलीची ही १००वी विकेट ठरली. त्यानंतर आलेल्या केन विलियम्सने ११ वी धाव घेताच नवा विक्रम नोंदवला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने २४ इनिंग्जमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांनी कमी १९ इंनिग्जमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत केन १००४* धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आला. स्टीफन फ्लेमिंग १०७५ धावा ( ३३ इनिंग्ज) पहिल्या व रॉस टेलर १००२ धावा ( ३० इनिंग्ज) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

रचिन रवींद्रने या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ४४३* धावांसह दुसरे स्थान पटकावले, विराट कोहलीला ( ४४२) त्याने मागे टाकले. रचिनने फॉर्म कायम राखताना अर्धशतक पूर्ण केले आणि अनुभवी केन त्याच्यासोबतीला उभा राहिला. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या रचिनने पाचवेळा ५०+ केल्या आहेत आणि वर्ल्ड कप पदार्पणात सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तित रचिनने स्थान पटकावले. डेव्हिड बून ( १९८७), राहुल द्रविड ( १९९९), केव्हीन पीटरसन ( २००७), जॉनथन ट्रॉट ( २०११), जेसन रॉय ( २०१९) व बेन स्टोक्स ( २०१९) यांनी हा पराक्रम केला होता.  

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपराहुल द्रविडन्यूझीलंडपाकिस्तान