ICC ODI World Cup Pak vs Nz Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडने ४०१ धावा उभ्या केल्या आणि पाकिस्तानकडून त्याला सडेतोड उत्तर मिळाले. दुखापतीमुळे न्यूझीलंडचे काही जलदगती गोलंदाज माघारी परतल्याने आज ३ फिरकीपटूंसह ते मैदानावर उतरले. अब्दुल्लाह शफीक लवकर माघारी परतल्यानंतर फखर जमान आणि बाबर आजम यांनी ११४ चेंडूंत १५४ धावांची नाबाद भागीदारी करून किवींना हतबल केले. फखरने पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. पावसाचे सावट लक्षात घेऊन पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि २१.२ षटकांत त्यांनी १ बाद १६० धावा केल्या. DSL नुसार पाकिस्तानचा संघ ११ धावांनी पुढे आहे. पावसामुळे सामना थांबला आहे.
रचिन रवींद्र ( Rachin Ravindra) आणि केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले. न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ४०१ धावा केल्या. केनने ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. रचिनने ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावा चोपल्या. डॅरील मिचेल ( २९ ) आणि मार्क चॅम्पमन ( ३९) यांनी ५१ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्स व मिचेल सँटनर यांनी २६ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली. सँटनरने १७ चेंडूंत २६ धावा चोपल्या. वन डे क्रिकेटमधील न्यूझीलंडची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यांनी २००८मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ४०२ धावा केल्या होत्या.
स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर अब्दुल्लाह शफिकने ( ४) कव्हरच्या दिशेने उत्तुंग फटका खेचला. पण, केन विलियम्सनने अविश्वसनीय झेल घेतला. त्यानंतर फखर जमान व बाबर आजम यांचा दमदार खेळ पाहायला मिळाला. फखर आक्रमक खेळ करत होता, तर बाबर संयमी खेळ करून त्याला चांगली साथ देत होता. फखर कुणालाच दाद देत नव्हता आणि त्याने मारलेले उत्तुंग फटके पाकिस्तानच्या आशा उंचावत होते. फखऱने ६३ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने शतक ठोकले आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानकडून हे सर्वात वेगवान शतक ठरले.
Web Title: PAK vs NZ Live : HUNDRED BY FAKHAR ZAMAN IN 63 BALLS, this is fastest WC hundred by a Pakistan batter, pakistan team 10 runs ahead as per DLS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.