ICC ODI World Cup Pak vs Nz Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडने ४०१ धावा उभ्या केल्या आणि पाकिस्तानकडून त्याला सडेतोड उत्तर मिळाले. दुखापतीमुळे न्यूझीलंडचे काही जलदगती गोलंदाज माघारी परतल्याने आज ३ फिरकीपटूंसह ते मैदानावर उतरले. अब्दुल्लाह शफीक लवकर माघारी परतल्यानंतर फखर जमान आणि बाबर आजम यांनी ११४ चेंडूंत १५४ धावांची नाबाद भागीदारी करून किवींना हतबल केले. फखरने पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. पावसाचे सावट लक्षात घेऊन पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि २१.२ षटकांत त्यांनी १ बाद १६० धावा केल्या. DSL नुसार पाकिस्तानचा संघ ११ धावांनी पुढे आहे. पावसामुळे सामना थांबला आहे.
रचिन रवींद्र ( Rachin Ravindra) आणि केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले. न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ४०१ धावा केल्या. केनने ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. रचिनने ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावा चोपल्या. डॅरील मिचेल ( २९ ) आणि मार्क चॅम्पमन ( ३९) यांनी ५१ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्स व मिचेल सँटनर यांनी २६ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली. सँटनरने १७ चेंडूंत २६ धावा चोपल्या. वन डे क्रिकेटमधील न्यूझीलंडची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्यांनी २००८मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ४०२ धावा केल्या होत्या.