ICC ODI World Cup Pak vs Nz Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान असा सामना होतोत... पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना न्यूझीलंड व पाकिस्तान या दोन्ही संघाना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. पण, न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तानने ही लढत जिंकावी अशी ३ संघांची इच्छा आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. न्यूझीलंड आज जिंकल्यास ४ संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत न्यूझीलंडने ९ पैकी दोन सामन्यांत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. पण, यंदाच्या पर्वात पाकिस्तानची कामगिरी फार चांगली झालेली नाही, तर न्यूझीलंडचा चांगल्या कामगिरीचा ग्राफ घसरलेला दिसतोय. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान टीम इंडियाने जागा पक्की केली आहे आणि आता ३ जागांसाठी ८ संघ शर्यतीत आहेत. बांगलादेश स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोघांनाही उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पण, आज न्यूझीलंड जिंकल्यास पाकिस्तानसह इंग्लंड, श्रीलंका व नेदरलँड्स यांचे आव्हान संपुष्टात येईल.
न्यूझीलंड ८ गुण व ०.४८४ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहेत, तर पाकिस्तानचे ६ गुण व -०.०२४असा नेट रन रेट आहे. त्यामुळे आजचा पराभव त्यांना स्पर्धेबाहेर फेकण्यासाठी पुरेसा आहे. श्रीलंका ( ४), नेदरलँड्स ( ४) व इंग्लंड ( २) हे अजूनही शर्यतीत असले तरी किवींचा विजय त्यांना स्पर्धेबाहेर फेकणारा ठरेल.