PAK vs NZ live: पाकिस्तानच्या बालेकिल्ल्यात विल्यमसनचा बोलबाला; दुहेरी शतक ठोकून यजमानांची केली धुलाई

Kane Williamson double Centurie: सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:45 PM2022-12-29T15:45:38+5:302022-12-29T15:46:59+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NZ live Kane Williamson hits a double century to take a 174-run lead into the third session on the fourth day of the first Test against Pakistan | PAK vs NZ live: पाकिस्तानच्या बालेकिल्ल्यात विल्यमसनचा बोलबाला; दुहेरी शतक ठोकून यजमानांची केली धुलाई

PAK vs NZ live: पाकिस्तानच्या बालेकिल्ल्यात विल्यमसनचा बोलबाला; दुहेरी शतक ठोकून यजमानांची केली धुलाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : सोमवारपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत यजमान पाकिस्तानच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी यजमान पाकिस्तानने शानदार खेळी केली. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 130.5 षटकांत सर्वबाद 438 धावा केल्या.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने देखील शानदार खेळी केली. किवी संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या बळीसाठी 183 धावांची भागीदारी नोंदवली. टॉम लॅथमने 113 धावांची शतकी खेळी केली तर डेव्होन कॉन्वेने 176 चेंडूत 92 धावांची शानदार खेळी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी संघाला किवी संघाचा पहिला बळी घेण्यात यश आले. तिसऱ्या दिवसाअखेर केन विल्यमसन 222 चेंडूत 105 धावांची शतकी खेळून खेळपट्टीवर टिकून होता. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 136 षटकांत 6 बाद 440 एवढी होती. खरं तर तिसऱ्या दिवसाअखेर किवी संघाने 2 धावांची आघाडी घेतली होती. लक्षणीय बाब म्हणजे केन विल्यमसनने तब्बल 722 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले.

चौथ्या दिवशी विल्यमसनने ठोकले द्विशतक 
चौथ्या दिवशी देखील विल्यमसनने शानदार खेळी केली आणि यजमान संघाची धुलाई केली. केन विल्यमसनने 200 धावांचा आकडा गाठला आणि 395 चेंडूत दुहेरी शतक झळकावले. पाहुण्या संघाने तिसऱ्या सत्राअखेर 9 बाद 612 धावा केल्या आहेत. सध्या विल्यमसन (नाबाद 200) आणि अजाज पटेल (नाबाद 0) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. लक्षणीय बाब म्हणजे किवी संघाने 174 धावांची शानदार आघाडी घेतली आहे. पाकिस्तानकडून अबरार अहमदने सर्वाधिक 5 बळी पटकावले. नौमान अलीने 3 बळी घेतले तर मोहम्मद वसीमला 1 बळी घेण्यात यश आले. 

पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - 
बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, शान मसूद, इमाम उल हक, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, नोमान अली, मोहम्मद वसीम, मीर हमजा, अबरार अहमद. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: PAK vs NZ live Kane Williamson hits a double century to take a 174-run lead into the third session on the fourth day of the first Test against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.