पाकिस्तानचा स्वतःच्या पायावर 'धोंडा'; रचिन रवींद्रची फटकेबाजी अन् न्यूझीलंडची सर्वोत्तम धावसंख्या

ICC ODI World Cup Pak vs Nz Live : पाकिस्तानी संघाचे सारे काही गंडलंय असंच जाणवतंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:42 PM2023-11-04T14:42:59+5:302023-11-04T14:43:31+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NZ Live : Rachin Ravindra ( 108), Kane Williamson ( 95), Phillips - 41 (25), New Zealand 401/6 - their highest ever World Cup total in history. | पाकिस्तानचा स्वतःच्या पायावर 'धोंडा'; रचिन रवींद्रची फटकेबाजी अन् न्यूझीलंडची सर्वोत्तम धावसंख्या

पाकिस्तानचा स्वतःच्या पायावर 'धोंडा'; रचिन रवींद्रची फटकेबाजी अन् न्यूझीलंडची सर्वोत्तम धावसंख्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup Pak vs Nz Live : पाकिस्तानी संघाचे सारे काही गंडलंय असंच जाणवतंय... नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या दुखापतग्रस्त गोलंदाजांना चोपण्याची संधी त्यांना होती, पण बाबर आजमला काय सुचलं कोण जाणं की त्याने गोलंदाजी स्वीकारली. मग काय, रचिन रवींद्र ( Rachin Ravindra) आणि दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले आणि मोठे लक्ष्य उभे केले. 

क्रिकेट : रचिन रविंद्रने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध ७ मोठे विक्रम


न्यूझीलंडकडूनवन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३ शतकांचा विक्रमही रचिनने आज नावावर केला.  ग्लेन टर्नर ( १९७५), मार्टीन गुप्तील ( २०१५) आणि केन विलियम्सन ( २०१९) यांना त्याने मागे टाकले.   केन आणि रचिन यांची १४२ चेंडूंत १८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. केन ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रचिन रवींद्रही ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावांवर बाद झाला.  पंचवीशी ओलांडण्यापूर्वी वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात सर्वाधिक ५२३ धावांच्या सचिन तेंडुलकरच्या ( १९९६) विक्रमाशी रचिनने बरोबरी केली. त्याने बाबर आजम ( ४७४) व एबी डिव्हिलियर्स ( ३७२) यांना मागे टाकले. 

Image
वर्ल्ड कप पदार्पणात सर्वाधिक धावांच्या विक्रमात रचिन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जॉनी बेअरस्टोीने २०१९मध्ये ५३२ धावा चोपल्या होत्या. रचिनने आज बाबर आजम ( ४७४ ) बेन स्टोक्स ( ४६५) व राहुल द्रविड ( ४६१) यांना मागे टाकले. केन व रचिन यांनी रचलेल्या मजबूत पायावर किवीच्या अन्य फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभी केली. डॅरील मिचेलने १८ चेंडूंत २९ धावा चोपल्या आणि मार्क चॅम्पमनसह ३२ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. चॅम्पमन ३९ धावांवर बाद झाला. ग्लेन फिलिप्स व मिचेल सँटनर यांनी २६ चेंडूत ४३ धावांची भागीदारी केली. सँटनरने १७ चेंडूंत २६ धावा करून न्यूझीलंडला ५० षटकांत ६ बाद ४०१ धावांपर्यंत पोहोचवले. वर्ल्ड कपमधील किवींची ही सर्वोत्तम धावसंख्या ठऱली. त्यांनी २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ६ बाद ३९३ धावा केल्या होत्या.  


 षटकांत खणखणीत फटकेबाजी केली. 
पाकिस्तानचा गोलंदाज हॅरीस रौफ याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक १६ षटकार खाणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तसेच वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा ( १-८५) गोलंदाजही तो ठरला.

Web Title: PAK vs NZ Live : Rachin Ravindra ( 108), Kane Williamson ( 95), Phillips - 41 (25), New Zealand 401/6 - their highest ever World Cup total in history.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.