ICC ODI World Cup Pak vs Nz Live : पाकिस्तानी संघाचे सारे काही गंडलंय असंच जाणवतंय... नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या दुखापतग्रस्त गोलंदाजांना चोपण्याची संधी त्यांना होती, पण बाबर आजमला काय सुचलं कोण जाणं की त्याने गोलंदाजी स्वीकारली. मग काय, रचिन रवींद्र ( Rachin Ravindra) आणि दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या केन विलियम्सन यांनी १८० धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजांना बेक्कार चोपले आणि मोठे लक्ष्य उभे केले.
क्रिकेट : रचिन रविंद्रने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानविरुद्ध ७ मोठे विक्रम
न्यूझीलंडकडूनवन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३ शतकांचा विक्रमही रचिनने आज नावावर केला. ग्लेन टर्नर ( १९७५), मार्टीन गुप्तील ( २०१५) आणि केन विलियम्सन ( २०१९) यांना त्याने मागे टाकले. केन आणि रचिन यांची १४२ चेंडूंत १८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. केन ७९ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रचिन रवींद्रही ९४ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावांवर बाद झाला. पंचवीशी ओलांडण्यापूर्वी वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात सर्वाधिक ५२३ धावांच्या सचिन तेंडुलकरच्या ( १९९६) विक्रमाशी रचिनने बरोबरी केली. त्याने बाबर आजम ( ४७४) व एबी डिव्हिलियर्स ( ३७२) यांना मागे टाकले.
षटकांत खणखणीत फटकेबाजी केली. पाकिस्तानचा गोलंदाज हॅरीस रौफ याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक १६ षटकार खाणारा तो पहिला गोलंदाज ठरला. तसेच वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा ( १-८५) गोलंदाजही तो ठरला.