पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील ४ सामने जिंकून यजमान न्यूझीलंडने एकतर्फी वर्चस्व राखले. शुक्रवारी या मालिकेतील चौथा सामना खेळवला गेला. या मालिकेत पहिल्यांदाच पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नेहमीप्रमाणे या सामन्यात देखील पाकिस्तानी फलंदाज अपयशी ठरले. पण, मोहम्मद रिझवानने लाज वाचवली अन् ९० धावांची खेळी केली. मात्र, पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शॉर्ट रन काढल्याबद्दल ट्रोल करण्यात आले.
रिझवानने ६३ चेंडूत ९० धावांची नाबाद खेळी केली. पण, या खेळीदरम्यान त्याने एक विचित्र धाव घेतली. बॅट हातात नसताना पाकिस्तानी खेळाडूने ती धाव ग्लोव्ह्ज घालून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण रिझवान रेषेपासून दूर राहिल्याने त्याला लक्ष्य करण्यात आले. भारतीय संघाचा खेळाडू शिखर धवनने देखील रिझवानची खिल्ली उडवली.
भारताचा सलामीवीर शिखर धवनने मोहम्मद रिझवानच्या या चुकीची फिरकी आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर रिझवानच्या शॉर्ट रनचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "कबड्डी कबड्डी कबड्डी." टीम इंडियाच्या गब्बरची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तर, धवनला या पोस्टवरून पाकिस्तानी चाहते सुनावत आहेत.
दरम्यान, न्यूझीलंडकडून मॅट हेनरी पाकिस्तानच्या डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आला होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिझवानने चेंडू डीप मिड-विकेटच्या दिशेने खेळला पण अचानक त्याचा तोल गेला. यामुळे बॅट हातातून सुटली. तो बॅटशिवाय धाव काढण्यासाठी धावला. ग्लोव्ह्ज घालून जमिनीला स्पर्श करून पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेसाठी गेला असता त्याची फजिती झाली. रिझवानने विकेट वाचवली खरी पण त्याने एक शॉर्ट रन काढली.
पाकिस्तानच्या पराभवाचा 'चौकार'पाकिस्तानने पाच सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीचे चार सामने गमावले आहेत. त्यामुळे अखेरचा सामना हा पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. यजमान न्यूझीलंडने ४-० अशी विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानी संघ प्रथमच शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात द्विपक्षीय मालिका खेळत आहे.