PAK vs NZ Test : पाकिस्तानी खेळाडूला लाईव्ह मॅचमध्ये आठवली 'पॉर्न' स्टार; मग तिने बाबर आजमच्या संघाला केले ट्रोल 

Pakistan vs New Zealand Test Live : पाकिस्तान संघासमोर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 05:55 PM2023-01-05T17:55:34+5:302023-01-05T17:55:53+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NZ Test : Pakistan commentator calling Dani Morrison "Dani Daniels", Porn star TROLLS Pakistan team, New Zealand declared, Pakistan need 319 runs from 93 overs to win the series | PAK vs NZ Test : पाकिस्तानी खेळाडूला लाईव्ह मॅचमध्ये आठवली 'पॉर्न' स्टार; मग तिने बाबर आजमच्या संघाला केले ट्रोल 

PAK vs NZ Test : पाकिस्तानी खेळाडूला लाईव्ह मॅचमध्ये आठवली 'पॉर्न' स्टार; मग तिने बाबर आजमच्या संघाला केले ट्रोल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs New Zealand Test Live : पाकिस्तान संघासमोर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले आहेत. पण या सामन्यात एक मजेशीर किस्सा घडला आणि त्यात थेट पॉर्न स्टारची एन्ट्री झाली. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला प्रचंड ट्रोल केले जात आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी माजी क्रिकेटपटू बाजिद खान याने ही चूक केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि पॉर्न स्टार डॅनी डॅनियल्सने ( Dani Daniels) बाबर आजम अँड टीमला ट्रोल केले आहे.  बाजीद खानने लाइव्ह मॅचमध्ये न्यूझीलंडच्या माजी खेळाडू डॅनी मॉरिसनचं नाव घेण्याऐवजी डॅनी डॅनियल्सचं नाव घेतलं अन् ... 

डॅनी डॅनियल्स ही अमेरिकन पॉर्न स्टार आहे. पाकिस्तानी समालोचकाने तिचे नाव घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिने पाकिस्तानच्या संघात प्रवेशाची मागणी केली. या व्हिडिओवर डॅनी डॅनियल्सने उत्तर देत 'मला संघाच्या प्रशिक्षकपदी घ्या' असे लिहिले. 

कोण आहे बाजीद खान?
बाजीद खान समालोचक आहे. बाजिदने पाकिस्तानसाठी एक कसोटी आणि पाच वन डे सामने खेळले आहेत. बाजीदची कारकीर्द केवळ ६ आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर संपली. बाजिदने पाकिस्तानमध्ये १५१ प्रथम श्रेणी सामने खेळले. याशिवाय त्याने ११२ लिस्ट ए आणि १७ ट्वेंटी-२० सामनेही खेळले आहेत.



न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ४४९ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४०८ धावा केल्या. किवींनी ५ बाद २७७ धावांवर दुसरा डाव घोषित करून पाकिस्तानसमोर ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले. पहिली कसोटी अनिर्णित राखल्यानंतर पाकिस्तानला मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. पण, त्यांचा सलामीवीर फलकावर शून्य धाव असतानाच माघारी परतला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: PAK vs NZ Test : Pakistan commentator calling Dani Morrison "Dani Daniels", Porn star TROLLS Pakistan team, New Zealand declared, Pakistan need 319 runs from 93 overs to win the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.