Join us  

PAK vs NZ: पाकिस्तानने मायदेशात लाज वाचवली; प्रकाशाचे कारण देत न्यूझीलंडविरूद्धचा सामना केला ड्रॉ

सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 7:04 PM

Open in App

कराची : सोमवारपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत यजमान पाकिस्तानच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान पाकिस्तानने शानदार खेळी केली. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 130.5 षटकांत सर्वबाद 438 धावा केल्या. पाहुण्या संघाने देखील शानदार प्रदर्शन करून यजमानांना घाम फोडला. 

आपल्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघाने देखील शानदार खेळी केली. किवी संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या बळीसाठी 183 धावांची भागीदारी नोंदवली. टॉम लॅथमने 113 धावांची शतकी खेळी केली तर डेव्होन कॉन्वेने 176 चेंडूत 92 धावांची शानदार खेळी केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी संघाला किवी संघाचा पहिला बळी घेण्यात यश आले. तिसऱ्या दिवसाअखेर केन विल्यमसन 222 चेंडूत 105 धावांची शतकी खेळून खेळपट्टीवर टिकून होता. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 136 षटकांत 6 बाद 440 एवढी होती. खरं तर तिसऱ्या दिवसाअखेर किवी संघाने 2 धावांची आघाडी घेतली होती. लक्षणीय बाब म्हणजे केन विल्यमसनने तब्बल 722 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले.

चौथ्या दिवशी विल्यमसनने ठोकले द्विशतक चौथ्या दिवशी देखील विल्यमसनने शानदार खेळी केली आणि यजमान संघाची धुलाई केली. केन विल्यमसनने 200 धावांचा आकडा गाठला आणि 395 चेंडूत दुहेरी शतक झळकावले. पाहुण्या संघाने तिसऱ्या सत्राअखेर 9 बाद 612 धावा केल्या. विल्यमसन (नाबाद 200) आणि अजाज पटेल (नाबाद 0) धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. किवी संघाने आपल्या पहिल्या डावात 9 बाद 612 धावा केल्या. पाकिस्तानकडून अबरार अहमदने सर्वाधिक 5 बळी पटकावले. नौमान अलीने 3 बळी घेतले तर मोहम्मद वसीमला 1 बळी घेण्यात यश आले. किवी संघाने 174 धावांची आघाडी घेऊन सामन्यात पकड मजबूत केली होती. 

पाकिस्तानची सावध खेळीपाकिस्तानच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावात सावध खेळी करण्यास सुरूवात केली. अब्दुला शफीक (17), इमाम उल हक (96), शान मसूद (10), नौमान अली (4), बाबर आझम (4), सरफराज अहमद (53), अघा सलमान (6), सौद शकील (नाबाद 55), मोहम्मद वसीम (43) आणि मीर हमजा 3 धावा करून बाद झाला. यजमान संघाने आपल्या दुसऱ्या डावात 8 बाद 311 धावा केल्या. किवी संघाकडून इश सोधीने सर्वाधिक 6 बळी घेतले तर मायकेल ब्रेसव्हेलला 2 बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने न्यूझीलंडसमोर 15 षटकांत विजयासाठी 138 धावांचे आव्हान ठेवले होते. 

पाकिस्तानने मायदेशात लाज वाचवली138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाला अवघ्या 4 धावांवर पहिला झटका बसला. अबरार अहमदने किवी संघाला पहिला झटका देत कराचीतील चाहत्यांना जागे केले. खरं तर सुरूवातीपासून पाहुण्या संघाची सामन्यात पकड मजबूत होती. लक्षणीय बाब म्हणजे प्रकाश कमी होत असल्याचे सांगत 7.3 षटकांपर्यंतच किवी संघाचा डाव थांबवण्यात आला. मात्र, प्रकाश कमी होत गेल्याने नियोजित 15 षटके होऊ शकली नाही आणि सामना अनिर्णित राहिला. किवी संघाने आपल्या दुसऱ्या डावात 7.3 षटकांत 1 बाद 61 धावा केल्या. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानी संघाने आपल्या मायदेशात 2022या वर्षात एकही कसोटी सामना जिंकला नाही. किवी संघाच्या विल्यमसनला द्विशतकी खेळीमुळे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. खरं तर पाकिस्तानने 2022 या वर्षात मायदेशात 7 कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील 4 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. 

पहिल्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, शान मसूद, इमाम उल हक, सौद शकील, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, नोमान अली, मोहम्मद वसीम, मीर हमजा, अबरार अहमद. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडबाबर आजमकेन विल्यमसन
Open in App