पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद अडचणीत, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी

यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट आणि 8 षटकं राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:50 AM2019-01-23T10:50:25+5:302019-01-23T10:50:40+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs SA: Pakistan skipper Sarfraz Ahmed's obscene words for Andile Phehlukwayo | पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद अडचणीत, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद अडचणीत, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट आणि 8 षटकं राखून विजय मिळवला.

डर्बन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट आणि 8 षटकं राखून विजय मिळवला. व्हॅन डेर डुसेर ( 80*) आणि अँडिले फेलुक्वायो ( 69*) यांच्या कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना जिंकला आणि मालिका 1-1 ने बरोबरीत आणली. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या फेलुक्वायो ( 4/22) याच्यावर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने वर्णद्वेषी टिप्पणी करून संकट ओढवून घेतले आहे.



पाकिस्तानच्या 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे तीन फलंदाज 29 धावांवर माघारी परतले होते. युवा गोलंदाज शाहीन आफ्रीदीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. पण, 5 बाद 80 अशा धावांवरून डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 37 व्या षटकात सर्फराजने केलेली वर्णद्वेषी टिप्पणी स्टम्प्समधील माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि वादाचा भडका उडाला. 


सर्फराज ऊर्दूत म्हणाला," अबे काले तेरी अम्मी आज कहाँ बैठी है? क्या पर्वाके आया है आज? ( तुझ्या आईने आज कोठे प्रार्थना केली की तू चांगली कामगिरी करत आहेस?)" सर्फराजचे हे वाक्य कॉमेंटेटर्सना कळले नाही आणि त्यांनी रमीझ राजाला अर्थ विचारला. त्यावर याचे भाषांतर करणे अवघड असल्याची सावध भूमिका रमीझ राजाने घेतली. 
 

सर्फराजच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. 








 

Web Title: PAK vs SA: Pakistan skipper Sarfraz Ahmed's obscene words for Andile Phehlukwayo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.