PAK vs SL Asia Cup 2022 :फायनलपूर्वी शुक्रवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2022 ची सुपर-4 चा सामना रंगला होता. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. सामन्यात पाकिस्तानचा पराभव निश्चितच झाला असली तरी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मात्र चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये बाबर आझम (Babar Azam) ‘मी कॅप्टन आहे’ असे म्हणताना दिसत आहे. पाहताच तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यापूर्वी श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तान आणि भारताचाही पराभव केला होता. आता पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने सुपर-4 मधील शेवटचा सामनाही जिंकला. याच सामन्यादरम्यान, 16 व्या षटकात, पंचांनी तिसऱ्या पंचाला डीआरएस अपीलसाठी सांगितले. परंतु यात बाबरनं मागणी केली नव्हती. दरम्यान, या व्हिडीओत बाबर पंचांच्या निर्णयावर खूश नसल्याचंही दिसून येत आहे."भावा कॅप्टन तर मी आहे, मी डीआरएस घेतला नाही, मला तरी विचारा,” असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
हसन अलीच्या ओवरमध्ये श्रीलंकेचा फलंदाज पथुम निशांकाच्या बॅटला चेंडू घासून गेला आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यानं झेल घेतला. रिझवाननं अपील केली परंतु पंचांनी नॉट आऊट दिलं. बाबर आझमला डीआरएस घ्यायचा नव्हतचा, परंतु पंचांनी डीआरएससाठी सांगितलं. यानंतर बाबरची ही रिअॅक्शन पाहायला मिळाली.
Web Title: pak vs sl asia cup 2022 video of pakistani captain babar azam saying i am captain brother ask me went viral see video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.