PAK vs WI : ना तुला ना मला....!; पाकिस्तानी खेळाडूंनी सोडला सोपा झेल, नेटिझन्सना मिळाली खिल्ली उडवण्याची संधी, Video

Pakistan vs West Indies : २००८मध्ये भारताविरुद्धच्या लढतीत शोएब मलिक व सईद अजमल यांनी असाच सोपा कॅच सोडला होता.  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:40 AM2021-12-17T10:40:25+5:302021-12-17T10:41:03+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs WI: Iftikhar Ahmed and M Hasnain dropped an easy catch, remind fans of SHOAIB-AJMAL epic drop, Watch video | PAK vs WI : ना तुला ना मला....!; पाकिस्तानी खेळाडूंनी सोडला सोपा झेल, नेटिझन्सना मिळाली खिल्ली उडवण्याची संधी, Video

PAK vs WI : ना तुला ना मला....!; पाकिस्तानी खेळाडूंनी सोडला सोपा झेल, नेटिझन्सना मिळाली खिल्ली उडवण्याची संधी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs West Indies : पाकिस्तान संघानं गुरुवारी विक्रमी धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघावर तिसऱ्या ट्वंटी-२० सामन्यातही विजय मिळवून मालिका ३-० अशी जिंकली. मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनी तुफान फटकेबाजी करताना २०८ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत सहज पार केले. पण, या सामन्यात इफ्तिखार अहमद व मोहम्मद हसनैन यांनी सोडलेला सोपा झेल, हा सर्वांच्या चर्चेचा ( मुळात खिल्लीचा) विषय ठरला. याच प्रकारे २००८ मध्ये शोएब मलिक व सईज अजमल यांनी झेल सोडला होता. इफ्तिखार व हसनैन यांच्यातील घोळानं २००८चा प्रसंगाची पुनरावृत्ती केली आणि नेटिझन्सना खिल्ली उडवण्याची संधी मिळाली. 

वेस्ट इंडिजच्या डावातील ८व्या षटकात हा प्रसंग घडला. विंडीजचा सलामीवीर शामार्ह ब्रूक्स यानं मोहम्मद नवाजनं टाकलेला पहिला चेंडू  सीमापार टोलवला आणि पुढील चेंडूवरही तो मोठा फटका मारायला गेला. पण, त्याचा हा प्रयत्न चुकला अन् चेंडू लाँग ऑनच्या दिशेनं उत्तुंग उडाला. लाँग ऑनवरून हसनैन आणि डीप मिडविकेटवरून इफ्तिखार तो झेल टिपण्यासाठी धावले. पण,  ना तुला ना मला... असा प्रकार घडला अन् चेंडू दोघांच्या मधोमध मैदानावर पडला. 

पाहा व्हिडीओ...


२००८मध्ये भारताविरुद्धच्या लढतीत शोएब मलिक व सईद अजमल यांनी असाच सोपा कॅच सोडला होता.  

ब्रेंडन किंग ( ४३), ब्रुक्स ( ४९), डॅरेन ब्राव्हो ( ३४) आणि कर्णधार निकोलस पूरन ( ६४) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं ३ बाद २०७ धावा केल्या. पण, मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनी पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा विजय पक्का केला. रिझवाननं ८७, तर बाबरनं ७९ धावा केल्या. आसीफ अलीनं ७ चेंडूंत २१ धावा चोपून पाकिस्तानला १८.५ षटकांत ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 

Web Title: PAK vs WI: Iftikhar Ahmed and M Hasnain dropped an easy catch, remind fans of SHOAIB-AJMAL epic drop, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.