Join us  

Babar Azam, PAK vs WI : पाकिस्तानच्या बाबर आजमचा आणखी एक विक्रम, पण पुढच्याच चेंडूवर Imam-ul-haq ची पाडली विकेट, Video  

PAK vs WI ODI : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 7:19 PM

Open in App

PAK vs WI ODI : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. पण, विक्रमी धाव घेतल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याच्या लेट कॉलमुळे विक्रमी कामगिरी करणाऱ्या इमाम-उल-हक ( Imam-ul-haq ) ला माघारी जावे लागले. इमाम एवढा संतापला की माघारी जाताना अनेकवेळा बॅट त्याने मैदानावर जोरदार आपटली. बाबर प्रमाणे त्यानेही सलग ६ वन डे सामन्यांत ५०+ धावांचा विक्रम करत दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले होते.

नाणेफेक जिंकून पाकिस्तान प्रथम फलंदाजीला आले. फाखर जमान ( १७) याला आज चांगली कामगिरी करता आली नाही. अँडरसन फिलिपने ७व्या षटकात त्याची विकेट घेतली. पण, त्यानंतर इमाम-उल-हक व बाबर आजम यांनी १२० धावांची भागीदारी करताना वेस्ट इंडिजसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दृष्टीने भक्कम पाया रचला. इमामने सलग सहाव्या वन डे सामन्यात अर्धशतक पूर्ण करताना आसिफ इक्बाल, यासीर हमीद, सलमान बट व हॅरीस सोहैल यांचा ( ५ ) विक्रम मोडला. या विक्रमात जावेद मियाँदाद ९ वेळा ५०+ धावा करून आघाडीवर आहेत.  गॉर्डन ग्रिनीज ( १९७९-८०), ए जोन्स ( १९८८-८९), मार्क वॉ ( १९९९), युसूफ युहाना ( २००३), केन विलियम्सन ( २०१५), रॉस टेलर ( २०१८-१९), ख्रिस गेल ( २०१८-१९), पॉल स्टीर्लिंग ( २०१९), शे होप ( २०२०-२१) यांच्या विक्रमाशी इमामने बरोबरी केली.  

इमाम व बाबर यांनी सलग चौथ्या वन डे सामन्यात शतकी भागीदारी पूर्ण केली. इमामनंतर बाबरनेही सलग सहा सामन्यांत ५०+ धावांच्या विक्रमात स्वतःचे नाव नोंदवले. पण, २८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर इमाम व बाबर यांच्यातला ताळमेळ चुकला. इमाम फटका मारल्यानंतर एक धाव घेण्यासाठी पळाला, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला असलेला बाबर त्याला नकार देत राहिला. इमामने त्याकडे लक्षच दिले नाही. तोपर्यंत निकोलस  पूरनने चेंडू यष्टीरक्षक शे होपकडे थ्रो केला आणि इमाम रन आऊट झाला. त्याने ७२ चेंडूंत ७२ धावा केल्या. पाकिस्तानला १४५ धावांवर दुसरा धक्का बसला. 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानवेस्ट इंडिज
Open in App