PAK vs ZIM: पाकिस्तानला पराभवाचा धक्का, शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वे 'सिकंदर'!

टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 08:17 PM2022-10-27T20:17:21+5:302022-10-27T20:17:28+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ZIM Zimbabwe beat Pakistan by 1 run to create history in World Cup 2022  | PAK vs ZIM: पाकिस्तानला पराभवाचा धक्का, शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वे 'सिकंदर'!

PAK vs ZIM: पाकिस्तानला पराभवाचा धक्का, शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वे 'सिकंदर'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ : टी-20 विश्वचषकात आज पर्थच्या स्टेडियमवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (PAK vs ZIM) यांच्यात सामना पार पडला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला 131 धावांचे आव्हानात्मक आव्हान दिले होते. झिम्बाब्वेच्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने घेतलेल्या 4 विकेटमुळे झिम्बाब्बेच्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. मात्र 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला. अखेर झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवून इतिहास रचला. 

तत्पुर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेकडून कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. शॉन विल्यम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या मात्र त्याच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला 30चा आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा टिकाव लागला नाही. तरीदेखील झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 बाद 130 धावा करून पाकिस्तानला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. 

पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव
पाकिस्तानला अखेरच्या 9 चेंडूमध्ये 9 चेंडूत 18 धावांची गरज होती. अशातच मोहम्मद नवाजने एक शानदार षटकार ठोकला. 8 चेंडूत 12 धावांची आवश्यकता असताना नवाजने एक धाव काढून मोहम्मद वसीमला स्ट्राईक दिले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. झिम्बाब्वेकडून शेवटचे षटक ब्रॅड इव्हान्स घेऊन आला. पहिलाच चेंडू मोहम्मद नवाजने बाउंड्रीच्या दिशेने मारला मात्र झिम्बाब्वेच्या फिल्डरने केलेल्या शानदार फिल्डिंगमुळे चौकार वाचला या चेंडूवर पाकिस्तानने 3 धावा खेचल्या. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद वसीमने चौकार ठोकून विजयाकडे कूच केली. तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक धाव काढून मोहम्मद नवाजला स्टाईक दिले. आता 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना तिसरा चेंडू डॉट गेला. 2 चेंडूत 3 धावांची गरज होती, दुसऱ्या चेंडूवर नवाज बाद झाला आणि झिम्बाब्वेने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती, शाहिन आफ्रिदीने अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने एक धाव काढली आणि दुसरी धाव काढताना शाहिन आफ्रिदी धावबाद झाला. अखेर झिम्बाब्वेने विजयावर शिक्कामोर्तब केला आणि ऐतिहासिक कामगिरी केली. आक्रमक वाटणारा मोहम्मद नवाज अखेरच्या षटकात झेलबाद झाला. 

पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक 44 धावा केल्या. पाकिस्तानला देखील सुरूवातीपासून मोठे झटके बसले. मोहम्मद रिझवान (14), कर्णधार बाबर आझम (4), शान मसूद (44), इफ्तिखार अहमद (5), शादाब खान (17) आणि हैदर अली (0) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंगर रझाने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ल्यूक जोंगवे यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - 
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह. 

पाकिस्तानची शानदार गोलंदाजी
झिम्बाब्वेकडून निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी वेस्ली माधवेरे (17) आणि क्रेग एर्विन (19) यांच्यात 42 धावांची चांगली भागीदारी झाली होती, परंतु यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांना कोणतीच मोठी भागीदारी नोंदवता आली नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा करून झिम्बाब्वेची फलंदाजी मोडित काढली. यामुळेच संघाची धावसंख्या 20 षटकांत केवळ 130 धावांपर्यंतच पोहोचू शकली. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 131 धावांचे आव्हान होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला अपयश आले. मात्र पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक (4) बळी पटकावले. तर शादाब खानला (3) आणि हारिस रौफला (1) बळी घेण्यात यश आले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Read in English

Web Title: PAK vs ZIM Zimbabwe beat Pakistan by 1 run to create history in World Cup 2022 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.