पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल; इतरांचं काय?

ICC Men's Cricket World Cup Super League पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंड संघाने भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या थेट पात्रतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 02:28 PM2022-08-22T14:28:47+5:302022-08-22T14:29:05+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan and New Zealand strengthened their chances of direct qualification for the ICC Men's Cricket World Cup 2023  | पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल; इतरांचं काय?

पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल; इतरांचं काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानपाठोपाठन्यूझीलंड संघाने भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या थेट पात्रतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पण, वेस्ट इंडिजची चिंता वाढली आहे आणि आता त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सने तिसऱ्या वन डे सामन्यात ९ धावांनी निसटता विजय मिळवला आणि १० गुणांची कमाई करताना ICC Men's Cricket World Cup Super Leagueमध्ये दुसरे स्थानावर बांगलादेशसह संयुक्तपणे विराजमान झाला आहे.

पाकिस्तान व बांगलादेश यांच्या खात्यात प्रत्येकी १२० गुण झाले आहेत आणि १२५  गुणांसह इंग्लंड अव्वल स्थानावर आहे.  न्यूझीलंडनेही पाच विकेट्स राखून वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवताना खात्यात १० गुणांची भर घातली. आता त्यांच्या खात्यात एकूण ११० गुण झाले आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. पण, तिसऱ्या वन डे सामन्यातील निकालाने वेस्ट इंडिजची डोकेदुखी वाढली आहे. त्यांनी सुपर लीगमधील सर्व २४ लढती खेळल्या आहेत आणि ९० गुणांसह ते सातव्या क्रमांकावर आहेत.  

ICC Men's Cricket World Cup Super League च्या गुणतालिकेतील अव्वल ८ संघ पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. वेस्ट इंडिज अजूनही अव्वल ८मध्ये आहेत, परंतु त्यांचे हे स्थान आता अन्य संघांच्या कामगिरीवर विसंबून आहे. त्यांच्यासमोर यजमान भारतासह अफगाणिस्तान आहेत. भारताने आज झिम्बाब्वेवर विजय मिळवल्यास ते पाचव्या क्रमांकावर सरकतील. 
वेस्ट इंडिजने थेट पात्रता मिळवली नाही, तर त्यांना पुढील वर्षी झिम्बाब्वेत होणाऱ्या पात्रता स्पर्धेत उर्वरित संघ व ५ संलग्न संघटनेच्या संघांसोबत खेळावे लागेल. विंडीजने १९७५ व १९७९ साली वर्ल्ड कप जिंकला होता आणि १९८३मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.  



काय आहे ICC Men's Cricket World Cup Super League?

  • वर्ल्ड कप सुपर लीग ही नवीन वन डे सामन्यांची स्पर्धा आहे. जी दोन वर्ष खेळवली जातेय. प्रथमच असा प्रयोग आयसीसीकडून होत आहे आणि या लीगमधून २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते संघ खेळतील हे ठरवले जातील. १३ संघांचा या लीगमध्ये सहभाग आहे आणि त्यात १२ पूर्ण सदस्यांचा व नेदरलँड्सचा समावेश आहे.
  •  या लीगमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी राहतो, त्यावर त्यांचे वर्ल्ड कप २०२३ मध्ये थेट खेळणे ठरणार आहे. या लीगमधील अव्वल ७ संघ वर्ल्ड कप २०२३ साठी थेट पात्र ठरतील आणि तळातील ५ संघांमध्ये पुन्हा पात्रता स्पर्धा खेळवली जाईल. लीगमध्ये एक संघ अन्य ८ संघांविरुद्ध किमान तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार. चार होम व चार अवे अशा या मालिका असतील.
  • प्रत्येक संघ २४ वन डे सामने खेळणार आणि प्रत्येक विजयाला १० गुण दिले जातात. टाय किंवा नो रिझल्टसाठी संघांना प्रत्येकी ५ गुण आणि पराभूत झाल्यास एकही गुण नाही. षटकांची गती संथ ठेवल्यास संघाला पेनल्टी म्हणून गुण कमी केले जातील.

Web Title: Pakistan and New Zealand strengthened their chances of direct qualification for the ICC Men's Cricket World Cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.