टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर, पाकिस्तानने फखर झमान, सर्फराजला दिला डच्यू

लाहोर आणि रावळपिंडी येथे ७ टी-२० सामने २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध सामना खेळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:25 AM2021-09-07T05:25:39+5:302021-09-07T05:26:17+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan announces squad for T20 World Cup pdc | टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर, पाकिस्तानने फखर झमान, सर्फराजला दिला डच्यू

टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर, पाकिस्तानने फखर झमान, सर्फराजला दिला डच्यू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देलाहोर आणि रावळपिंडी येथे ७ टी-२० सामने २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध सामना खेळेल

कराची : अनुभवी खेळाडू फखर झमान आणि यष्टिरक्षक सर्फराज अहमद यांना पाकिस्तान संघातून डच्यू मिळाला आहे. सोमवारी टी-२० विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघातून या दोघांना वगळले असून अनुभवी आसिफ आली आणि खुशदिल शाह यांचे मात्र पुनरागमन झाले. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषकाआधी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळेल.

लाहोर आणि रावळपिंडी येथे ७ टी-२० सामने २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध सामना खेळेल. विश्वचषकाचे आयोजन १७ ऑक्टोबरपासून ओमान आणि यूएईत होईल. २९ सामने खेळणाऱ्या आसिफने झिम्बाब्वेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. डावखुरा फलंदाज खुशदिल याने नऊ सामने खेळले आहेत. 
‘आसिफ आणि खुशदिल यांची आकडेवारी प्रभावी नसेलही मात्र दोघेही मधल्या फळीसाठी फार उपयुक्त खेळाडू ठरतील,’ असा विश्वास मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांनी व्यक्त केला आहे.

मिस्बाह, वकार यांचा कोचपदाचा राजीनामा
n पाकिस्तान संघाचे मुख्य कोच मिस्बाह उल हक आणि गोलंदाजी कोच वकार यूनुस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २०१९ला या दोन्ही दिग्गजांना राष्ट्रीय संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मिस्बाह आणि वकार यांनी पद सोडल्यानंतर पीसीबीने सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रझ्झाक यांची न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी अंतरिम कोच म्हणून नियुक्ती केली आहे.
n आगामी टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची सोमवारी घोषणा होताच मिस्बाह तसेच वकार यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. दोघांचाही आणखी वर्षभराचा करार शिल्लक असल्याने त्यांचा राजीनामा सर्वांना आश्चर्यचकित करणारा ठरला.

टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, आजम खान, हारिस रौफ, हसन अली, इमान वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहीन शाह आफ्रिदी, सोहेब मकसूद.
पुढे आले कारण...
मिस्बाह-उल-हकने पीसीबीला राजीनाम्याचे कारण सांगितले. मिस्बाह गेल्या २४ महिन्यांपासून संघासोबत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी आहेत. त्यामुळे कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. पदावरून दूर होण्याची ही योग्य वेळ नाही हे मान्य असले तरी नवे आव्हान पेलण्यास मानसिकरीत्या तयार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Pakistan announces squad for T20 World Cup pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.