सलग तीन पराभवामुळे पाकिस्तानची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाली आहे, पण असे असले तरी पाकिस्तानच्या WTC Final खेळण्याच्या आशा अजूनही जिवंत आहे, संधी मात्र कमी कमी आहे. मंगळवारी कराचीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. कसोटी इतिहासात प्रथमच ते घरच्या मैदानावर ३-० असे पराभूत झाले आहेत आणि हा त्यांचा सलग चौथा कसोटी पराभव आहे.
१९६२ ते १९९५ या कालावधीत पाकिस्तानने घरच्या मैदानावर ८५ कसोटींपैकी ४ कसोटी गमावल्या होत्या. ३३ वर्षानंतर पाकिस्तानने मागील ९ महिन्यांत घरच्या मैदानावर सलग चार कसोटी सामने गमावले. पाकिस्तान घरच्या मैदानावर प्रथमच सलग चार कसोटी सामने पराभूत झाला.. यापूर्वी १९५९मध्ये पाकिस्तानने घरी सलग तीन कसोटी सामने गमावले होते. इंग्लडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुढे म्हणजेच तिसऱ्या स्थानावर होता आणि आता तो श्रीलंकेच्या मागे म्हणजेच सातव्या स्थानावर फेकला गेलाय. भारताच्या अंतिम फेरीच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला, असे वाटत होते, परंतु ICCच्या ट्विटने सर्वांचे टेंशन वाढवले.
पाकिस्तानला प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी होती. घरच्या मैदानावर होणाऱ्या पाच सामन्यांत ( तीन इंग्लंडविरुद्ध आणि दोन न्यूझीलंडविरुद्ध) त्यांनी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश पक्का केला असता. पण, इंग्लंडविरुद्ध त्यांना ३-० असा व्हाईटवॉश पत्करावा लागला. पाकिस्तान मात्र तरीही फायनलमध्ये पोहोचू शकतो, परंतु त्यांच्या अनेक शक्यता इतर घटकांवर अवलंबून रहावे लागेल. ज्यामध्ये अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया हा महत्त्वाची भूमिका बजावेल.
- या महिन्याच्या शेवटी मालिका होणाऱ्या मालिकेत पाकिस्तानला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपची नोंदवावी लागेल आणि त्यानंतर त्यांची विजयाची टक्केवारी ४७.६२ अशी होईल.
- अंतिम फेरीत जाण्यासाठी पाकिस्तान मुख्यतः ऑस्ट्रेलियावर अवलंबून असेल. ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेवर आणि त्यानंतर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वर्चस्व कायम ठेवावे लागेल.
- बांगलादेशने २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मीरपूर कसोटीत भारताला हरवले तर पाकिस्तानचा फायदा होईल. त्याचवेळी मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा पराभव व्हावा अशी पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल
- वेस्ट इंडिजकडूनही पाकिस्तानला मदत लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या दोन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने व्हाईटवॉश मिळवला किंवा एका कसोटीत विजय आणि दुसरी अनिर्णित राखली, तर पाकिस्तानचा फायदा होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"