लाहोर : पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अली याला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे. त्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा कॅन्सरशी लढा अपयशी ठरला आणि तिचे निधन झाले. लंडनमधील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते आणि तेथेच तिने अखेरचा श्वास घेतला. आसीफ हा इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील पाकिस्तान संघाचा सदस्य होता. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक यांनी या बातमीला दुजोरा दिला. शिवाय पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनी आसीफचे सांत्वन केले आहे.
आसीफच्या मुलीला चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता. निधनाचे वृत्त आले त्यावेळी आसीफ इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या वन डे सामन्यात मैदानावर खेळत होता. त्याने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. पाकिस्तानला हा सामना 54 धावांनी गमवावा लागला. या मालिकेत आसीफने चार सामन्यांत 35.50च्या सरासरीनं 142 धावा केल्या. पाकिस्तानकडून एकूण 16 वन डे सामन्यांत त्याने 342 धावा केल्या आहेत.
Web Title: Pakistan batsman Asif Ali to return home from England after death of 2-year-old daughter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.