लाहोर : पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अली याला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे. त्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा कॅन्सरशी लढा अपयशी ठरला आणि तिचे निधन झाले. लंडनमधील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते आणि तेथेच तिने अखेरचा श्वास घेतला. आसीफ हा इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील पाकिस्तान संघाचा सदस्य होता. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक यांनी या बातमीला दुजोरा दिला. शिवाय पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनी आसीफचे सांत्वन केले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अलीच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन
पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अलीच्या दोन वर्षांच्या कन्येचं निधन
पाकिस्तानचा फलंदाज आसीफ अली याला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 11:24 IST