England vs Pakistan 2nd Test : दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली दिसली. प्रथम फलंदाजी करताना त्यांचे 9 फलंदाज 223 धावांवर माघारी परतले आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली, पण पाकिस्तानच्या फलंदाजांच्या उतावळेपणानंही त्यांचा घात केला. . दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानच्या 9 बाद 223 धावा झाल्या होत्या, रिझवान 60 धावांवर नाबाद आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'!
पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीतील शतकवीर शान मसूदला ( 1) जेम्स अँडरसननं तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले. अबीद अली ( 60) आणि कर्णधार अझर अली (20) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अँडरसननं पुन्हा एक धक्का दिला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुरन आणि वोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेताना पहिल्या दिवशी पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 45.4 षटकांनंतर थांबवण्यात आला.
दुसऱ्या दिवशी बाबर आझम (47) आणि मोहम्मद रिझवान ( 60) यांनी संघर्ष दाखवताना पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अन्य फलंदाजांकडून त्यांना साथ मिळाली नाही. पाकिस्तान संघाच्या या कामगिरीवर माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनं नाराजी व्यक्त केली आणि खेळाडूंचे कान उपटले.
तो म्हणाला,''पाकिस्तानी फलंदाज फटके मारण्यास घाबरत आहेत. तुम्ही त्यांनी फेकलेल्या विकेट्स पाहिल्यात तर तुम्हाला हे लक्षात येईल की, त्यापैकी अनेकदा त्यांची बॅट ही पायाच्या मागे असल्याचे दिसेल. तुमची बॅट ही पायाच्या पुढे असायला हवी, अन्यथा तुम्ही फलंदाजी कशी करू शकाल. बचावात्मक पवित्र्यात असल्यानं अऩेक फलंदाज स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतत आहेत. फलंदाज आणि संघ व्यवस्थापन यांना मी विनंती करतो की, इंग्लंडला पराभूत करायचे असेल तर आक्रमक खेळ करा. अन्यथा, कसोटी वाचवण्यासाठी आपल्याला पावसावर अवलंबून रहावं लागेल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'!
भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'
Independence Day 2020 : व्हॉट अॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो
IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट!
जर्मन कंपनीनं ज्या कामासाठी मागितले 50 लाख, ते काम आपल्या इंजिनियर्सनी केलं दीड लाखात!