पाकिस्ताननं दोन वर्षांनंतर जिंकली पहिली ट्वेंटी-20 मालिका

पाकिस्तान क्रिकेट संघानं शनिवारी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात बांगलादेशवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:18 PM2020-01-25T18:18:08+5:302020-01-25T18:21:14+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan beat Bangladesh in 2nd T20I, this is pakistan's first T20I series victory since October 2018 | पाकिस्ताननं दोन वर्षांनंतर जिंकली पहिली ट्वेंटी-20 मालिका

पाकिस्ताननं दोन वर्षांनंतर जिंकली पहिली ट्वेंटी-20 मालिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट संघानं शनिवारी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात बांगलादेशवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तान संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. विशेष म्हणजे पाकिस्ताननं 12 जून 2018नंतर प्रथमच ट्वेंटी-20 मालिका जिंकली आहे. बांगलादेशचे 137 धावांचे लक्ष्य पाकनं 16.4 षटकांत सहज पार केले.

पहिला सामना जिंकल्यानंतर पाकनं दुसऱ्या सामन्यातही दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला 20 षटकांत 6 बाद 136 धावांवर समाधाना मानण्यास भाग पाडले. सलामीवीर तमीम इक्बालनं 53 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 65 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अफिफ होसैन ( 21) आणि कर्णधार महमदुल्लाह ( 12) यांना दुहेरी आकडा गाठता आला. पाकिस्तानच्या मोहम्मद हस्नैननं दोन विकेट्स घेतल्या.


कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद हाफिज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं हे लक्ष्य सहज पार केले. आझमनं 44 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 66, तर हाफिजनं 49 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकारासह नाबाद 67 धावा केल्या. पाकिस्ताननं सलग चार ट्वेंटी-20 मालिका गमावल्यानंतर पहिला मालिका विजय नोंदवला आहे.


त्यांनी 2018मध्ये स्कॉटलंडवर ( 2-0) अखेरचा मालिका विजय नोंदवला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( 2-1), इंग्लंड ( 1-0), श्रीलंका ( 3-0) आणि ऑस्ट्रेलिया ( 3-0) यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 2018नंतर पाकिस्ताननं पहिली ट्वेंटी-20 मालिका जिंकली. 

Web Title: Pakistan beat Bangladesh in 2nd T20I, this is pakistan's first T20I series victory since October 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.