लंडन - पाकिस्तानने इंग्लंडचा रविवारी पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ९ गडी राखून पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
इंग्लंडने आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावातील उर्वरित चार फलंदाज २५ चेंडूंमध्ये गमावले. इंग्लंडचा दुसरा डाव २४२ धावांत संपुष्टात आला. पाकपुढे विजयासाठी ६४ धावांचे लक्ष्य होते. त्यांनी उपाहारापूर्वी एका गड्याच्या मोबदल्यात ६६ धावा करीत सहज विजय साकारला.
इमाम-उल-हक १८ धावा काढून नाबाद राहिला, तर डोमिनिक बेसच्या गोलंदाजीवर विजयी चौकार ठोकणाºया हॅरिस सोहेलने नाबाद ३९ धावा केल्या.
इंग्लंडच्या दोन्ही डावांमध्ये आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया इंग्लंडचा पहिला डाव १८४ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने ३६३ धावांची मजल मारली.
दुसºया डावात इंग्लंडची एकवेळ ६ बाद ११० अशी अवस्था होती. त्यानंतर जोस बटलर (६७) आणि पदार्पणाची कसोटी खेळणारा डोमिनिक बेस (५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने डावाने पराभवाची नामुष्की टाळली. इंग्लंडने आज सकाळी ६ बाद २३५ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण केवळ ७ धावांच्या मोबदल्यात त्यांचे उर्वरित चार फलंदाज माघारी परतले. बटलरला कालच्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ एका धावेची भर घालता आली. त्यानंतर मार्क वूड (४) व स्टुअर्ट ब्रॉड (०) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. बेसने कालच्या वैयक्तिक धावसंख्येत दोन धावांची भर घातली. इंग्लंडच्या दुसºया डावात बाद होणारा तो अखेरचा फलंदाज ठरला.
इंग्लंडचा गेल्या १० कसोटी सामन्यांतील हा सातवा पराभव आहे. दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हेडिंग्लेमध्ये खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: Pakistan beat England in first Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.