Join us  

पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वांवर भारी पडणार, अगदी टीम इंडियावरही - वाहब रियाझ

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असो किंवा वन डे टीम इंडिया नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर भारी ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 8:43 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असो किंवा वन डे टीम इंडिया नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर भारी ठरली आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकदाही वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर विजय मिळवता आलेला नाही. पण, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हा इतिहास बदलेल अन् पाकिस्तानचा संघ टीम इंडियासोबतच सर्व संघावर भारी पडेल, असा दावा पाकिस्तानचा गोलंदाज वाहब रियाझ यानं केला आहे. ( Pakistan’s pacer Wahab Riaz has asserted that Pakistan can beat India in the upcoming T20 World Cup)  

OUT असूनही रोहित शर्मा खेळपट्टीवर खेळत राहिला; जो रूटच्या चुकीचा इंग्लंडला फटका!

पाकिस्तानच्या सध्याच्या संघात बाजी मारण्याची क्षमता आहे, असे वाहब रियाझला वाटते.''ग्रीन आर्मीत सर्व संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचा संघ संपूर्ण क्षमतेनं खेळला तर तो भारतच काय, तर सर्व संघांना पराभूत करेल. ट्वेंटी-२० हा असा फॉरमॅट आहे की जिथे काही चेंडूंत किंवा एका प्रसंगानं सामन्याचे चित्र बदलतं. पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना काही वेगळा नाही. पाकिस्तान संघ ताकदिनं खेळला तर तो भारतालाही पराभूत करेल,''असे तो म्हणाला.

 

पाकिस्तानचा संघ मागील दहा वर्ष संयुक्त अरब अमिराती येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. २४ ऑक्टोबरला उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीगणेशा करणार आहे. वर्ल्ड कप यूएईत शिफ्ट झाल्याचा फायदा पाकिस्तानलाच होईल, असेही वाहबला वाटते. ''यूएईतील खेळपट्टी पाकिस्तान संघासाठी पुरक आहे. गेली अनेक वर्ष पाकिस्तानचा संघ इथे खेळतोय आणि जेतेपद पटकावण्याची ही चांगली संधी आहे, '' असेही वाहब म्हणाला.

पाकिस्तानचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील वेळापत्रक

  • २४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
  • २९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता
  • ७ नोव्हेंबर -  पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता 
टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App