Join us  

बाबर आजमने खूप प्रयत्न केला, पण 'विराट'ला मागे टाकण्यात अपयशी ठरला; आला दुसरा

बाबरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार व ११ हजार धावा करणाऱ्या आशियाई फलंदाजा विक्रम आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:29 PM

Open in App

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam ) हा आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावा करणारा दुसरा आशियाई फलंदाज ठरला. एका इनिंग्जमुळे त्याला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मोडता आला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात बाबरने या विक्रमाची नोंद केली. त्याने २७७ आंतरराष्ट्रीय इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला. विराटला हा टप्पा ओलांडण्यासाठी २७६ इनिंग्ज खेळाव्या लागल्या.  

बाबर आमि विराट कोहली हे जगातील सर्वात जलद १२ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या जो रूटच्या ( २७५ इनिंग्ज) मागे आहेत. या विक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्डस २५५ इनिंग्जसह अव्वल स्थानी आहेत. पाकिस्तानच्या कर्णधाराने ४७ कसोटीच्या ८५ डावांत ३६९६ धावा, ९६ वन डे सामन्यांतील ९४ इनिंग्जमध्ये ४८१९ धावा आणि १०४ ट्वेंटी-२० सामन्यांतील ९८ इनिंग्जमध्ये ३४८५ धावा केल्या आहेत. बाबरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार व ११ हजार धावा करणाऱ्या आशियाई फलंदाजा विक्रम आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानविराट कोहली
Open in App