तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत 

 ICC Men’s Test Batting rankings : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत उलटफेर पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 04:05 PM2021-08-25T16:05:45+5:302021-08-25T16:06:18+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan captain Babar Azam has climbed a spot on the ICC Men’s Test Batting rankings, Rishabh Pant drops one slot  | तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत 

तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 ICC Men’s Test Batting rankings : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत उलटफेर पाहायला मिळाले. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याला फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा धक्का बसला अन् त्याला कारणीभूत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ठरला आहे. जसप्रीत बुमराह हाही टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे. ( Pakistan captain Babar Azam has climbed a spot) 

टीम इंडियानं नाणेफेक जिंकली अन् दोन फलंदाज ४ धावांवर गमावलेही!

पाकिस्ताननं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. बाबरनं या कसोटीत ७५ व ३३ धावांची खेळी केली. त्यामुळे त्यानं आयसीसी कसोटी फलंदाजांमध्ये ७४९ गुणांसह एक स्थानाच्या सुधारणेसह ७व्या क्रमांकावर झेप घेतली. याशिवाय फलंदाजांच्या क्रमवारीत बदल झालेला नाही. पाकिस्तानचा शतकवीर फवाद आलम ३४ स्थानांच्या सुधारणेसह २१व्या क्रमांकावर आला आहे. मोहम्मद रिझवानही टॉप २०मध्ये आला आहे. बाबारनं रिषभ पंतला ८व्या स्थानावर ढकलले. विराट कोहली ( ७७६) व रोहित शर्मा ( ७७३) अनुक्रमे ५व्या व ६व्या क्रमांकावर कायम आहेत. 

Shocking : फायनलपूर्वी नीरज चोप्राचा भाला घेऊन पाकिस्तानी खेळाडू भटकत होता अन्...


पाकिस्तानचा डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर हा पुरस्कारही मिळाला. त्यानं कारकीर्दितील सर्वोत्तम क्रमवारी निश्चित करताना ८वा क्रमांक पटकावला. त्याला १० स्थानांचा फायदा झाला. भारताचा गोलंदाज बुमराह मात्र एक स्थान खाली सरकून ११व्या क्रमांकावर गेला.
 

Web Title: Pakistan captain Babar Azam has climbed a spot on the ICC Men’s Test Batting rankings, Rishabh Pant drops one slot 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.