Babar Azam, Rohan Gavaskar: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर अलीकडेच टी२० क्रिकेटमधील त्याच्या स्ट्राइक रेटवरून अनेक चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत केवळ त्याने ११.३३ च्या सरासरीने आणि १०७च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. असे असले तरी सध्या सुरू असलेल्या सात सामन्यांच्या T20 मालिकेत इंग्लंडविरुद्ध त्याचा फॉर्म आणि स्ट्राइक रेट सुधारला आहे. त्यामुळेच या चर्चेला काही अंशी विराम मिळाल्याचे चिन्ह आहे. याच दरम्यान महान क्रिकेटर सुनील गावसकर यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटर रोहन गावसकर याने मत व्यक्त केले आहे.
बाबर आझम हा केवळ एकाच पद्धतीची म्हणजे बचावात्मक व संयमी फलंदाजी करु शकतो असे मानले जात होते. पण रोहन गावस्करने हा दावा फेटाळून लावला आहे, त्यासोबतच तो किती प्रतिभावान खेळाडू आहे हे त्याच्या कारकिर्दीची आकडेवारी स्पष्टपणे सांगते असेही रोहनने म्हटले आहे. बाबर आझमला एका पद्धतीचा खेळाडू म्हणणे चुकीचे ठरेल. कारण त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. त्याच्या खेळाची आकडेवारी पाहिल्या तुम्हाला नीट अंदाज येईल की बाबर आझममध्ये किती प्रतिभा व कला आहे. बाबर आझम हा असा खेळाडू आहे जो त्याला हवे तेव्हा वेगवान खेळू शकतो आणि हवे तेव्हा संयमी फलंदाजी करु शकतो", असे रोहन गावसकर म्हणाला.
"रोहन गावसकरच्या फलंदाजीमध्ये एक खास बात आहे. त्याची पहिल्या डावातील कामगिरी आणि आव्हानाचा पाठलाग करताना केलेली कामगिरी पाहिली तर त्याच्या फलंदाजीच्या सामर्थ्याचा नीट अंदाज येईल. पहिल्या डावात त्याचा स्ट्राईक रेट १२५ आहे तर दुसऱ्या डावात खेळताना हाच स्ट्राईक रेट १३७ होतो. याचाच अर्थ तो मनात आलं की वेगवान खेळी करु शकतो. मला असं वाटतं की बाबर आझम सध्या अपयश येण्याच्या भीतीमुळे खेळताना सावध असतो. त्याने तसा विचार करु नये", असेही रोहन गावसकर म्हणाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Pakistan Captain Babar Azam is not one dimensional batsman praises Rohan Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.