Join us  

Babar Azam, Pakistan vs Zimbabwe: बिच्चारा बाबर आझम... 'झिम्बाब्वे' शब्दही लिहीता आला नाही, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

झिम्बाब्वेकडून हरल्यानंतर पाकिस्तान हा चेष्टेटा विषय झालाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 2:49 PM

Open in App

Babar Azam, Pakistan vs Zimbabwe: पाकिस्तान क्रिकेट संघाचा नुकताच झिम्बाब्वे विरूद्ध धक्कादायक पराभव झाला. तुलनेने कमकुवत असलेल्या झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानवरुद्ध १ धावेने थरारक विजय मिळवला. झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १३० धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला एक धाव कमीच पडली. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना त्यांना एकच धाव काढता आली आणि दुसऱ्या धावेला फलंदाज धावचीत झाला. या पराभवानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा झिम्बाब्वे या शब्दामुळे ट्रोल झाला आहे.

पाकिस्तानी खेळाडू ही नेहमीच त्यांच्या इंग्रजीमुळे ट्रोल होता. अनेकवेळा या कारणावरून संघाचा कर्णधार बाबर आझम आणि संघातील इतर खेळाडू चेष्टेचा विषय ठरले आहेत. सध्या संघाचा कर्णधार बाबर आझमचा याला ट्रोल केलं जात आहे. वास्तविक, बाबर आझमचे ७ वर्ष जुने ट्विट युजर्सना सापडले असून त्यावर त्याला ट्रोल केलं जात असल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये बाबरने इंग्रजीत फक्त 'वेलकम झिम्बाब्वे' असे लिहिले आहे, मात्र यामध्ये त्याने अशी स्पेलिंग मिस्टेक केली आहे की, आजपर्यंत त्याला त्यावरून ट्रोल केले जात आहे. T20 World Cup 2022 मध्ये झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर युजर्सनी त्याचे हे ट्वीट शोधू काढत त्याला पुन्हा एकदा ट्रोल केले आहे.

बाबर आझमला ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही झिम्बाब्वेचे चुकीचे स्पेलिंग लिहिल्याचा बदला त्यानी घेतला आहे.' त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ऑस्ट्रेलिया विमानतळावरून पाकिस्तानमध्ये स्वागत आहे.' तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'वेलकम झिम्बाबर.'

--

--

दरम्यान, आस्‍ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी२० विश्‍वचषकात पाक संघ आत्तापर्यंत आपल्‍या विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. आधी तो टीम इंडियाकडून पराभूत झाला, त्यानंतर त्याला झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही सामने शेवटच्या षटकापर्यंत गेले. झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. तर भारतीय संघाने ४ गडी राखून पराभव केला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानबाबर आजमझिम्बाब्वे
Open in App