Join us

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

IPL vs BBL: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:04 IST

Open in App

Babar Azam on ipl । नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग 2023 चा थरार रंगला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पेशावर झाल्मीचा संघ एलिमिनेटर सामन्यात पोहोचला आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी पेशावरच्या संघासमोर इस्लामाबाद युनायटेडचे आव्हान आहे. या सामन्यापूर्वी पेशावर झाल्मीचा कर्णधार बाबर आझमने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

IPL पेक्षा BBL भारी - बाबर आझम या मुलाखतीदरम्यान बाबरला आयपीएल आणि बिग बॅश लीगशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्याने असे उत्तर दिले जे चाहत्यांना अपेक्षित नव्हते. अँकरने बाबरला विचारले की त्याला कोणती लीग जास्त आवडते इंडियन प्रीमिअर लीग (IPL) की बीग बॅश लीग (BBL). बाबर आझमने आयपीएलचे नाव घ्यावे अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. पण त्याने बीबीएलला त्याची आवडती लीग म्हणून पसंती दिली. तसेच बीग बॅश लीगमधून खूप काही शिकण्यासारखे असते, मात्र आयपीएलमध्ये सोपी खेळपट्टी असते असेही बाबर आझमने सांगितले. 

बाबरचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलपेक्षा बीबीएल फेव्हरेट असल्याचे म्हणतो. मात्र, त्याचे उत्तर भारतीय चाहत्यांना आवडले नाही आणि त्यामुळेच बाबर आझमला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मरतात, पण त्याची लोकप्रियता मान्य करण्यास ते नेहमी टाळाटाळ करतात, असे म्हणत बाबरला चाहते ट्रोल करत आहेत.

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. मग तो पैशाचा विषय असो की या लीगमध्ये खेळणारे जगभरातील स्टार खेळाडू असो. सर्वच स्तरावर ही लीग इतर लीगला मागे टाकते. अशा परिस्थितीत बाबरने आयपीएलऐवजी बीबीएलची निवड करणे चुकीचे असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानट्रोलआयपीएल २०२२बिग बॅश लीग
Open in App