नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या खराब स्ट्राईक रेटमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. चाहते आणि क्रिकेट वर्तुळातील अनेक दिग्गज मंडळी त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. बाबरला नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेत काही खास कामगिरी करता आली नव्हती. अलीकडेच पाकिस्तानचा माजी खेळाडू अकीब जावेदने म्हटले होते की, पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) त्यांचा संघ जाणूनबुजून बाबरला बाद करत नव्हता.
"बाबर आझम फारच धीम्या गतीने धावा करत असतो, ज्याचा आमच्या संघाला खूप फायदा व्हायचा. त्यामुळे आमचा कराची किंग्सचा संघ कर्णधार बाबरला बाद करत नव्हता." असा गौप्यस्फोट अकीब जावेदने केला होता. यावरूनच बाबर आझमला प्रश्न विचारला असता तो चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.
वैयक्तिक पातळीवर बोलू नका - बाबरदरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी बाबर आझमने पत्रकार परिषद घेतली. याचदरम्यान पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बाबरने म्हटले, "त्यांना तसे वाटत असेल तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता पाकिस्तानच्या संघाबद्दल भाष्य केले तर ते जास्त चांगले होईल. लोक आपापाली मतं व्यक्त करत असतात. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि संघाबाहेरच्या गोष्टी आणतही नाही."
"सर्वांचे लक्ष्य एकच असते. एक खेळाडू म्हणून प्रत्येक खेळाडूला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. किती दबाव असतो, किती समस्या असतात. अनेक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे वैयक्तिक पातळीवर बोलू नका. हे केवळ माझ्याबाबत नसून संपूर्ण संघाबाबत आहे त्यामुळे सामान्य गोष्टींवर बोला", अशा शब्दांत बाबरने पत्रकारांची देखील फिरकी घेतली.
बाबर आझमचे मागील एक वर्षापासून टी-20 मधील प्रदर्शन सामने - 19धावा - 550सरासरी - 30.55स्ट्राईक रेट - 121.95अर्धशतके - 6
बाबर आझमचे टी-20 कारकिर्दीतील प्रदर्शन एकूण सामने - 80धावा - 2,754सरासरी - 42.36स्ट्राईक रेट - 128.81शतक - 1अर्धशतके - 26