Babar Azam Virat Kohli: पाकिस्तानच्या बाबरने विराटसाठी केलं खास ट्वीट; नेटकऱ्यांनाही भरून आलं..

'एक ही दिल है, कितनी बार जितोगे'.. अशा आशयाच्या कमेंट्स या ट्वीट वर दिसल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 01:03 PM2022-07-15T13:03:57+5:302022-07-15T13:04:46+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Captain Babar Azam tweet Support Virat Kohli in bad times Ind vs Pak twitter users overwhelming responce emotional comments | Babar Azam Virat Kohli: पाकिस्तानच्या बाबरने विराटसाठी केलं खास ट्वीट; नेटकऱ्यांनाही भरून आलं..

Babar Azam Virat Kohli: पाकिस्तानच्या बाबरने विराटसाठी केलं खास ट्वीट; नेटकऱ्यांनाही भरून आलं..

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Babar Azam Virat Kohli: लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर बुधवारी टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ १४६ धावांवरच बाद झाला. या मोठ्या पराभवानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीवर टीकेची झोड उठली. पण सामन्याचा निकाल आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष एका वेगळ्याच ट्विटकडे वेधले गेले. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने ते ट्वीट केले होते. बाबर आझमने विराट कोहलीसोबत एक फोटो टाकत, 'ही (वाईट) वेळही निघून जाईल', असा पाठराखण करणारा संदेश दिला. या मैत्रीचे आणि ट्वीटचे साऱ्यांनीच कौतुक केले.

विराट कोहली गेली सुमारे तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकाची वाट पाहत आहे. सध्या तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यावर आहे. एकेकाळचा रनमशिन असलेल्या विराटच्या बॅटमधून सध्या धावाच निघत नाहीत. अनेक दिग्गज आणि चाहते त्याला साथ देत आहेत. तशातच बाबर आझमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.

बाबर आझमने हे ट्विट केल्यानंतर साऱ्यांनीच कौतुक केले. पाहूया त्यापैकी निवडक ट्वीट-

--

--

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष कायमच टोकाचा असतो. असे असताना बाबर आझमने असे ट्विट करण्याचे मोठं मन दाखवल्याने सर्वांनाच आवडलं. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. बाबर आझमचं हे ट्विट २५ हजारांहून अधिक वेळा रिट्विट झालं आणि लाखो लोकांनी लाईकही केलं.

Web Title: Pakistan Captain Babar Azam tweet Support Virat Kohli in bad times Ind vs Pak twitter users overwhelming responce emotional comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.