Join us  

Babar Azam, PAK vs AUS: स्वत:साठी कायपण?? पाकिस्तानी कर्णधाराने बाद होताच केली 'ती' कृती, चाहते संतापले (Video)

बाबरने नक्की केलं तरी काय... पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 6:21 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानी संघाच्या फलंदाजांनी चाहत्यांना निराश केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३९१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यास प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ द्विशतकी मजल मारेपर्यंत चांगल्या स्थितीत होता, पण नंतर धडाधड फलंदाज बाद झाल्याने संघाचा डाव २६८ धावांवर आटोपला. महत्वाची बाब म्हणजे, या डावात पाक संघाचा कर्णधार बाबर आझम याने अर्धशतकी खेळी केली. पण तो बाद झाल्यावर जी कृती त्याने केली, त्यामुळे चाहते त्याच्यावर भलतेच नाराज झाले.

पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद २४८ होती. त्यानंतर अवघ्या २० धावांत धडाधड पाकिस्तानचा डाव गडगडला. कर्णधार बाबर आझमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तोदेखील मिचेल स्टार्कच्या स्विंग गोलंदाजीचा शिकार झाला. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे त्याने केलेल्या रिव्हर्स स्विंगवर बाबर बाद झाला. चेंडू सरळ स्टंपच्या दिशेत असल्याचं दिसूनही बाबर आझमने स्वत:साठी DRSचा पर्याय स्वीकारला. अखेर त्यातही तो बादच आढळला. त्यामुळे त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पाहा Video -

बाबर आझमच्या विकेटनंतर अनेकांनी त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीवर टीका केली. तळाच्या फलंदाजांसोबत कसं खेळावं हे त्याला समजत नाही, असं काहींनी म्हटलं. तर DRS हा अंपारर्स कॉल असल्याने काही चाहत्यांनी बाबरला तर काहींनी अंपायरच बोल लावले. दरम्यान, पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (८१) आणि अझर अली (७८) यांनी दमदार खेळी केल्या. पण त्यानंतरच्या फलंदाजांनी चाहत्यांनी घोर निराशा केली.

टॅग्स :बाबर आजमआॅस्ट्रेलियापाकिस्तानसोशल मीडिया
Open in App