कराची : विश्वचषकातनंतर पाकिस्तानच्या संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. निवड समिती अध्यक्ष आणि प्रशिक्षकांनाही बदलण्यात आले आहे. पण तरीही पाकिस्तानची कामगिरी सुधारताना दिसत नाही. त्यामुळे आता पाकिस्तानचा कर्णधाक सर्फराझ अहमदला आता डच्चू देण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या संघातील युवा क्रिकेटपटूला आता संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी देण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक मिसबाह उल हक हे संघातील खेळाडूंच्या वागण्यामुळे हैराण झालेले पाहायला मिळतात. कारण पाकिस्तानला श्रीलंकेबरोबरच्या तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढलेले आहे. पण दुसरीकडे मात्र खेळाडू मिसबाह यांचे काहीच ऐकत नसल्याचेही पुढे आले आहे.
एका सूत्राने सांगितले की, " मिसबाह यांना संघाचा स्तर वाढवायचा आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण संघातील वरिष्ठ खेळाडू त्यांचे काहीच ऐकत नसल्याचे समोर येत आहे. मिसबाह जेव्हा खेळाडूंना ट्रेनिंगसाठी बोलवतात तेव्हा ते काही तरी बहाणा बनवून झोपा काढतात. हीच गोष्ट मिसबाह यांना खटकत आहे."
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ आणि मिसबाह यांच्यामध्ये विस्तव जात नसल्याचे म्हटले जात आहे. कारण सर्फराझ हा मिसबाह यांचे म्हणणे ऐकत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात बदल करायचा असेल तर सर्फराझकडून कर्णधारपद काढून घेण्यात यावे, असा सूर संघातील काही खेळाडूंनी आळवला आहे. त्यामुळे आता सर्फराझचे कर्णधारपद धोक्यात असून अझर अलीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे.
पाकिस्तानमध्ये तीन दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त होती श्रीलंकेची टीम
पाक मंडळाची श्रीलंकेकडे अजब मागणी, कसोटी मालिका खेळायचीय तर खर्च उचलाश्रीलंका क्रिकेट संघानं नुकतीच पाकिस्तानात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळली. 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने झाले नव्हते. एक दोन सामने वगळता, पाकिस्तानात मोठा संघ येण्याची ही पहिलीच वेळ होती. ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेनंतर आता पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळवण्यास उत्सुक आहे. पाकिस्ताननं कसोटी मालिकेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. पण, त्याचवेळी श्रीलंकेला ही कसोटी मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळायची असल्यास त्यांनी खर्च उचलावा, अशी अजब मागणी पीसीबीनं केली आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील कसोटी मालिकेचा खर्च उचलण्यास पीसीबी तयार नाही. पीसीबीचे म्हणणे आहे की,''श्रीलंकेचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास उत्सुक नसेल आणि ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे व्हावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी पीसीबीसोबत मिळून मालिकेचा खर्च उचलावा.''