jason gillespie pakistan coach : पाकिस्तान क्रिकेट संघाला वेगवान गोलंदाजांची फळी असलेला संघ म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून ही ओळख जपण्यात शेजाऱ्यांना अपयश आले. शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह या त्रिकुटाची बेक्कार धुलाई होत आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानी संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. वन डे विश्वचषकातील पराभवापासून शेजारील देशातील क्रिकेटमध्ये भूकंप पाहायला मिळत आहे. अलीकडेच गॅरी कस्टर्न यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जेसन गिलेस्पी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. गिलेस्पी यांनी आधुनिक काळातील क्रिकेटमध्ये 'न खेळता येणारे' गोलंदाज म्हणून दोन स्टार खेळाडूंची नावे घेतली.
जेसन गिलेस्पीने मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फलंदाजांना खेळताना अडचणी निर्माण करतात असे गोलंदाज म्हणून पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराह यांची नावे घेतली. त्यांनी सांगितले की, फलंदाजांची कमजोर बाजू ओळखून प्रभावी गोलंदाजी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकता येईल. त्यांच्याकडे चांगली गती, चांगल्या लाइन आणि लेन्थवर गोलंदाजी करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. ते नेहमी फलंदाजांच्या क्षमतेविषयी प्रश्न विचारत असतात. गिलेस्पी यांनी 'इंडियन एक्सप्रेस'साठी लिहिलेल्या लेखात आपले मत मांडले.
दरम्यान, पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, तिथे वन डे आणि ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. वन डे मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. दुसरा सामना शुक्रवारी होणार आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तान प्रथमच मालिका खेळत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ - वन डे - मोहम्मद रिझवान (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफीक, अफरत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसनबुल्लाह, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद खान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, शाहीन आफ्रिदी. ट्वेंटी-२० - मोहम्मद रिझवान (कर्णधार), अफरत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसनबुल्लाह, जुनैद खान, मोहम्मद आफ्रिदी, मोहम्मद खान, नसीम शाह, ओमेर युसूफ, शाहीबजादा फरहान, सलमान अली अघा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.