PAK vs NZ: पाकिस्तानचा भारतासह अन्य टीम्सना इशारा; तुम्हाला वाटलं आमच्यापासून तुमची सुटका झाली पण...

पाकिस्तानच्या संघाने नशिबाच्या जोरावर अखेर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:07 PM2022-11-07T13:07:08+5:302022-11-07T13:07:20+5:30

whatsapp join usJoin us
pakistan coach matthew Hayden sends huge warning to IND, ENG and NZ as Pakistan after enter WC semis  | PAK vs NZ: पाकिस्तानचा भारतासह अन्य टीम्सना इशारा; तुम्हाला वाटलं आमच्यापासून तुमची सुटका झाली पण...

PAK vs NZ: पाकिस्तानचा भारतासह अन्य टीम्सना इशारा; तुम्हाला वाटलं आमच्यापासून तुमची सुटका झाली पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाने नशिबाच्या जोरावर अखेर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे शेजाऱ्यांना उपांत्य फेरी गाठता आली. पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला अशी चर्चा असतानाच संघाने बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली. अशातच पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना अन्य संघाना इशारा दिला आहे. पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील सामना बलाढ्य न्यूझीलंडसोबत होणार आहे. 

अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे, तर ब गटातून कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. शेजाऱ्यांनी बांगलादेशला पराभूत केल्यानंतर माजी विश्वविजेते रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासोबत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सामील झाले आहेत. बाबर आणि कंपनीला नशिबाने साथ दिल्यानंतर संघाचे प्रशिक्षक हेडन यांनी विजेतेपदाचे दावेदार भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंडला एक मोठा इशारा दिला.

मॅथ्यू हेड यांनी दिला इशारा 
मॅथ्यू हेडन यांनी पाकिस्तानी संघाला मार्गदर्शन करताना म्हटले, "सगळ्यांना वाटत होते की पाकिस्तानी संघ विश्वचषकातून बाहेर झाला आहे. मात्र पाकिस्तानी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाना धोका निर्माण झाला आहे. या स्पर्धेत असा कोणीही नसेल ज्याला आताच्या घडीला आमचा सामना करावासा वाटेल, असा एकही संघ नाही. पाकिस्तानपासून आपली सुटका झाली असे त्यांना वाटले होते. आता ते आमची सुटका करणार नाहीत." अशा शब्दांत मॅथ्यू हेडन यांनी उपांत्य फेरीतील संघाना इशारा दिला आहे. 

13 तारखेला होणार अंतिम सामना 
"जर नेदरलॅंड्सचा संघ जिंकला नसता तर कदाचित आपण इथे नसतो. आता आम्ही येथे आहोत आणि ती एक मोठी गोष्ट आहे कारण आम्हाला येथे कोणीही पाहू इच्छित नाही आणि हीच आश्चर्याची बाब आहे, ज्याचा आम्हाला फायदा झाला आहे", असे पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी अधिक म्हटले. उपांत्य फेरीतील पाकिस्तानचा सामना 9 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. तर 10 तारखेला दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर होईल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: pakistan coach matthew Hayden sends huge warning to IND, ENG and NZ as Pakistan after enter WC semis 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.