Join us  

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कर्स्टन यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:39 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमी काही ना काही नाट्यमय घडामोडी घडत असतात. आता या नाट्यमय घडामोडी वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत. अलीकडेच पाकिस्तानने मायदेशात मोठ्या कालावधीनंतर कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही धाडसी निर्णय घेतले. माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाकावर बसवण्यात आले. मग संधी मिळालेल्या साजिद खान, नौमान अली आणि कामरान गुलाम यांनी अप्रतिम कामगिरी केली. अखेर पाकिस्तानने २-१ ने कसोटी मालिका जिंकली. खरे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्याबद्दल काहीही बाबी सांगितल्या जात असल्याने प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पदाचा राजीनामा दिला. 

दरम्यान, पाकिस्तानने कसोटी मालिका जिंकताच संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचा स्वीकार करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, जेसन गिलेस्पी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. पाकिस्तानच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चार नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल. तिथे तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होईल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ - वन डे - मोहम्मद रिझवान (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफीक, अफरत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हारिस रौफ, हसनबुल्लाह, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद खान, नसीम शाह, सैय अयुब, सलमान अली अघा, शाहीन आफ्रिदी. ट्वेंटी-२० - मोहम्मद रिझवान (कर्णधार), अफरत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसनबुल्लाह, जुनैद खान, मोहम्मद आफ्रिदी, मोहम्मद खान, नसीम शाह, ओमेर युसूफ, शाहीबजादा फरहान, सलमान अली अघा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान. 

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा४ नोव्हेंबर, पहिला वन डे सामना ८ नोव्हेंबर, दुसरा वन डे सामना१० नोव्हेंबर, तिसरा वन डे सामना१४ नोव्हेंबर, पहिला ट्वेंटी-२० सामना १६ नोव्हेंबर, दुसरा ट्वेंटी-२० सामना१८ नोव्हेंबर, तिसरा ट्वेंटी-२० सामना 

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया