पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा अध्यक्ष मिळताच PSLवर सायबर हल्ला; तिकीट विक्री खोळंबली

तिकीट विक्रीची सुरुवात लांबली, कधीपासून सुरू होणार याबाबत अस्पष्टता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 10:23 AM2024-02-07T10:23:43+5:302024-02-07T10:30:18+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Cricket Board Cyber attack on PSL 9 ticketing website leaves fans angry | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा अध्यक्ष मिळताच PSLवर सायबर हल्ला; तिकीट विक्री खोळंबली

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवा अध्यक्ष मिळताच PSLवर सायबर हल्ला; तिकीट विक्री खोळंबली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Cyber Attack on Pakistan Super League: पाकिस्तान सुपर लीगचा ९वा सीझन म्हणजेच PSL १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पण, त्यापूर्वीच या लीगच्या ऑनलाइन तिकिटांच्या विक्रीला ग्रहण लागले. PSL-9च्या ऑनलाइन तिकीट वेबसाइटवर सायबर हल्ला झाला आहे, त्यामुळेच तिकिटांच्या विक्रीलाही विलंब होत आहे. मोहसीन नक्वी यांच्या रूपाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नवे अध्यक्ष मिळाले असतानाच ही घटना घडली. त्यामुळे याची वेगळी चर्चाही रंगली आहे.

PSL 9 चे ऑनलाइन तिकीट बुकिंग ६ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार होते. पण, वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आता सामन्यांच्या तिकिटांसाठी चाहत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. तिकीट विक्री कधीपासून सुरू होणार याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र संकेतस्थळावरील सायबर हल्ल्याची समस्या दूर होताच तिकिटांची विक्री सुरू केली जाईल, असे मानले जात आहे. म्हणजेच चाहत्यांना तोपर्यंत वाट पाहावी लागेल.

PSLने सायबर हल्ल्याची माहिती दिली

ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर झालेल्या सायबर हल्ल्याची माहिती पाकिस्तान सुपर लीगनेच आपल्या एक्स-हँडलवर दिली. पीएसएलने लिहिले की आमच्या तिकीट वेबसाइटवर सायबर हल्ला झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात तांत्रिक पथक व्यस्त आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही लवकरच ही समस्या दूर करू, त्यानंतर तिकिटांची विक्री सुरू केली जाईल.

PSL 9 स्पर्धा १७ फेब्रुवारीपासून; सर्वाधिक ११ सामने कराचीत

१७ फेब्रुवारीला सुरू होणारा PSL 9 चा पहिला सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कराचीत १८ मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्याच्या तिकिटांची किंमत वेगळी आहे. क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांची तिकिटे अंतिम सामन्यापेक्षा किंचित स्वस्त आहेत. पाकिस्तान सुपर लीगच्या ९व्या हंगामात, कराचीमध्ये जास्तीत जास्त ११ सामने खेळवले जातील, जेथे अंतिम सामना देखील होणार आहे.

Web Title: Pakistan Cricket Board Cyber attack on PSL 9 ticketing website leaves fans angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.