Join us  

Breaking: इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या पाकिस्तान संघातील तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

हैदर अली, हरीस रऊफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:26 PM

Open in App
ठळक मुद्देपाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

लाहोर : पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या वृत्ताला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे.

पाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इंग्लंड दौर्‍यापूर्वी रविवारी रावळपिंडी येथे पाकिस्तान संघातील खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. तोपर्यंत या खेळाडूंमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे आढळून आली नव्हती.

दरम्यान, आता कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या हैदर अली, हरीस राऊफ आणि शादाब खान या तिन्ही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल टीमच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले असून त्यांना लगेच आयसोलशेन करण्यात आले आहे. याशिवाय, इमाद वसीम आणि उस्मान शिंवरी या खेळाडूंनी रावळपिंडी येथे कोरोनाची टेस्ट केली. मात्र, त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ते 24 जून लाहोरला जातील.

क्लिफ डिकन, शोएब मलिक आणि वकार युनूस वगळता अन्य खेळाडू आणि संघातील अधिकाऱ्यांची सोमवारी कराची, लाहोर आणि पेशावर येथील आरोग्य केंद्रांवर कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांच्या टेस्टचा  रिपोर्ट मंगळवारी येणे अपेक्षित असून यासंदर्भातील माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून चॅनेलच्या माध्यमातून दिली जाईल.

आणखी बातम्या...

जगन्नाथ रथ यात्रेआधी पुरीत 41 तासांचे शटडाऊन; सर्व एंट्री पॉईंट्स बंद

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी पाहिले; मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही घेणार सूचना

CoronaVirus News : धनंजय मुंडेंची कोरोनावर यशस्वी मात; योद्ध्यांचे हात जोडून मानले आभार!

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे!

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या