pakistan cricket board : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत असते. पाकिस्तान क्रिकेटमधील नाट्यमय घडामोडी आणि बोर्डातील अधिकाऱ्यांनी घेतलेले अनोखे निर्णय क्रिकेट विश्वाला आकर्षित करतात. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आणि संपूर्ण संघरचनाच बदलली. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर नवीन समिती आणि नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ आगामी काळात दिसणार आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत आले असून त्यांच्या एका निर्णयावर त्यांनी यू-टर्न घेतला आहे.
पाकिस्तानात सध्या नॅशनल ट्वेंटी-२० ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू आझम खानने बॅटवर पॅलेस्टाईनचे स्टिकर लावून फलंदाजी केली. याची दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर कारवाई करत त्याला दंड आकारला. पीसीबीने आझमसह १०० खेळाडूंवर कारवाई केली होती. पण, मंगळवारी बोर्डाने निर्णय बदलला आणि आझम खानची ५० टक्के मॅच फी माफ केली.
PCBने निर्णय बदलला
खरं तर पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार मोईन खानचा मुलगा आझम खानला दोन दिवसांपूर्वी मॅच रेफरीने मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावला होता. बॅटवर असलेले पॅलेस्टाईनचे स्टिकर पाहून पंचानी सामना काही वेळासाठी थांबवला. याची दखल घेत पीसीबीने कारवाईचे आश्वासन दिले मात्र मंगळवारी त्यांनी निर्णय बदलला. आझम खान या सामन्यादरम्यान पंचांच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे आचारसंहितेच्या कलम २.४ चे उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आला. लक्षणीय बाब म्हणजे आझम खानचा हा दंड माफ करण्यामागे पीसीबीने कोणतेही कारण दिले नाही.
Web Title: Pakistan Cricket Board has waived the punishment of Azam Khan for planting the Palestine flag on the bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.