पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. ५३ सदस्यांच्या संघातील ७ खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर वारंवार आयसोलेशन नियमांचं उल्लंघन केल्यामुळे न्यूझीलंड सरकरानं त्यांना फायनल वॉर्निंग दिली. पण, आता या खेळाडूंची तिसरी चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना सराव करण्याची परवानगी मिळाली आहे. पण, क्वारंटाईनमध्ये असलेल्या खेळाडू व सपोर्ट स्टाफचा मानसिक ताण कमी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) मानसोपचारतज्ञ नेमणार आहे. PCB खेळाडूंसाठी ऑनलाईन सेशन घेणार असून त्यात मानसोपचारतज्ञ खेळाडूंशी संवाद साधणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार इंग्लंडमधील स्पेशालिस्टशी चर्चा सुरू होती, परंतु न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील १३ तासांचा फरक असल्यानं तो पर्याय रद्द केला. स्थानिक तज्ञाचा शोध सुरू आहे.