भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबाद येथे दाखल होईल. न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळल्यानंतर मुख्य फेरीत त्यांचा पहिला मुकाबला नेदरलँड्सविरुद्ध ६ ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल होण्यापूर्वीच बरेच वाद झाले. त्यात भर पडली ती Visa मान्यतेची.. पाकिस्तानी पत्रकारांकडून भारत मुद्दाम पाकिस्तान क्रिकेट संघाला व्हिसा देण्यास विलंब करत असल्याचा आरोप झाला. पण, अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेच त्यांची कानउघडणी केली अन् सत्य सांगितले.
आशिया चषक स्पर्धेत मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानी संघ आता वर्ल्ड कपची तयारी करत आहे. भारतात येणार नाही असा सूर गेल्या काही महिन्यांपासून पीसीबीचा होता. त्यात व्हिसा मिळत नसल्याचो बोंब ठोकण्यात आली होती. पण, भारताने पाकिस्तानी संघाला व्हिसा मंजूर केला आहे. पाकिस्तानी संघाला २७ सप्टेंबरला हैदराबादला पोहोचायचे आहे. दोन दिवस आधीच भारताने व्हिसा मंजूर केला आहे. पाकिस्तानने १९ सप्टेंबरला व्हिसासाठी अर्ज केला होता. यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया आटोपून भारताने व्हिसा मंजूर केला आहे.
या सर्व घडामोडींवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर मौन सोडले. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला व्हिसा लवकरात लवकर दिल्याबद्दल भारत सरकार आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांचे आभार मानले. पत्रकारांना खोट्या बातम्या न देण्याचे आवाहन केले.
विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हरिस रौफ , मोहम्मद वसीम जूनियर
Web Title: Pakistan Cricket Board issues a statement regarding allotment of Indian visas for the Pakistan cricket team for CWC23, thanks the Indian government and the BCCI including Secretary JayShah for prompt action
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.